हेच ते खतरोंके खिलाडी, टास्क दरम्यान कनिकाला झाली मोठी दुखापत हातांवर जखमा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रहो मनोरंजन क्षेत्रात अनेक शो व्हायरल होत असतात, यातून प्रेक्षकांचे नेहमी विशेष मनोरंजन होत असते. मात्र प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी कलाकार खूप मेहनत घेतात. आपली कला प्रत्येक वेळी नव्याने सर्वत्र कौतुकास्पद ठरावी यासाठी कलाकार प्रचंड कष्ट करत असतात. त्यांच्या कष्टाची दाद देणे हे एक रसिक या नात्याने आपले कर्तव्य बनते. अनेक कॉमेडी शो असतात, थरारक वाटणारे शो असतात शिवाय काही रिऍलिटी शो देखील असतात. यातीलच एक शो आहे खतरो के खिलाडी, या शोमधील सर्व कलाकार विशेष मनोरंजन करतात.

रोहित शेट्टीचा शो खतरो के खिलाडी मध्ये अनेक कठीण स्टंट पाहायला मिळतात. हे स्टंट साधे पाहिले तरी आपल्या अंगावर काटे उभे राहतात. दरम्यान हे स्टंट करताना अनेक सेलेब्स जखमी सुद्धा होतात. या शो च्या सुरुवातीलाच कनिका मानचे देखील असेच हाल झाले आहे. खतरो के खिलाडी १२ चा कनिका देखील एक भाग आहे. दिलेला टास्क परफॉर्म करत असताना कनिका भरपूर जखमी झाली आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कनिका खूप जखमी दिसत आहे.

See also  बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतला चाहत्याने विचारले 'तू सिंगल का आहेस?' त्यानंतर जे झाले...

फोटोमध्ये आपण पाहू शकतो की कनिकाच्या हातांवर व पायावर खूप वाईट जखमा झाल्या आहेत. त्वचेची साल निघत आहेत पण इतक्या जखमा होऊनही कनिका खूप गोड स्माईल देत पोज दिली आहे. तिची ही स्माईल तिच्या सर्व जखमा दुर्लक्षित करण्यास प्रवृत्त करत आहेत मात्र तरीही तिच्या चाहत्यांना या जखमा स्पष्ट दिसत असून तिच्या वेदना जाणवत आहेत. अनेकांनी तिच्या फोटोवर कमेन्ट केली आहे, तर काहीजणांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तिला औषध उपचार घेण्यास सांगितले आहे.

हा शो २ जुलै पासून सुरू होत आहे, कलर्स चॅनेलवर दर शनिवारी व रविवारी प्रेक्षक मंडळी हा शो पाहू शकतात. या शोमध्ये कनिका सोबत बिग बॉस फेम रुबिना दीलैक, प्रतीक सहजपाल, निशांत भट्ट, राजीव अदातीया यांच्या सह अनेक स्टार आपणाला पाहायला मिळतील. त्यांच्या कार्याचे इथे खूप कौतुक होत आहे, सर्वांनी आपला जीव धोक्यात घालून अनेक कठीण,थरारक वाटणाऱ्या गोष्टी हाताळल्या आहेत. आपण ज्याचा फक्त विचार करू शकतो किंवा कल्पना देखील कधी कधी करू शकत नाही अशा गोष्टी त्यांना कराव्या लागतात.

See also  'तारक मेहता...' मधील जेठालाल आणि बबिता खऱ्या जीवनात आहेत खूपच श्रीमंत, बबिताजीची संपत्ती ऐकून थक्क व्हाल!

हा शो अनेकांना खूप आवडतो, याचे आधीचे सर्व भाग रसिकांनी फार आवडीने पाहिले आहेत. तसेच यातून होऊन गेलेले कलाकार खूप प्रसिद्ध झाले आहेत, नेहमीच त्यांच्या धाडसी पणाचे सर्वत्र कौतुक होत असते. कनिकाचे देखील खूप कौतुक होत असून तिच्या जखमांमागे असलेले तिचे धाडसीपण स्पष्ट जाणवत आहे. तिने आपली काळजी घ्यावी असे सर्व चाहत्यांना मनापासून वाटत आहे. तिला तिच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेन्ट करून नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment