“आई कुठे काय करते” या मालिकेचा होणार अशाप्रकारे शेवट, अरुंधतीने व्यक्त केल्या आपल्या भावना..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“आई कुठं काय करते” ही मालिका सध्या प्रत्येक घराघरांत मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली आहे. यामधील नाटक व सिनेमांमध्ये फारसं काम न केलेली अरुंधती हिने मात्र चाहत्यांच्या मनावर आपली झक्कास अशी छाप उमटवली. अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने आपल्या मुलाखतीत या मालिकेचा शेवट कशाप्रकारे होईल, हे सांगितले आहे.

या मुलाखतीत स्त्रीला मित्र असावेत का? या प्रश्नावर तिने अगदी बिनधास्तपणे उत्तर दिले आहे. मधुराणी म्हणते की,”हो प्रत्येक स्त्रीला मित्र असावेत. माझ्यामते तर स्त्रियांना एक नव्हे तर भरपूर मित्र असावेत. कारण एक स्त्री दुसर्या स्त्री सोबत अतिशय मनमोकळेपणाने संवाद साधू शकत नाही. त्याच विषयावर ती एखाद्या पुरूषासोबत अगदी बिनधास्तपणे संकोच न करता बोलू शकते. त्याचप्रमाणे एक पुरुष मित्र स्त्रीला खूप चांगले समजून घेऊ शकतो.

See also  फँड्री फेम अभिनेत्री लवकरच करणार बॉलीवुड पदार्पण, तिच्या चित्रपटाचे नाव देखील आले समोर...

मधुराणी प्रभुलकर हिने अगदी कमी नाटकांत- सिनेमांत काम केले आहे. त्यापैकी तिचे “कवितेचं पान” आणि “रंगपंढरी” हे दोन कार्यक्रम सोशल मीडियावर बरेच लोकप्रिय आहेत. “कवितेचं पान” या कार्यक्रमात तिने गुगलवरील मराठी कवितांचे अनेक संदर्भ उलगडून दिले आहेत. यामध्ये तिने अनेक कवींना बोलतं केलं आहे. त्याचप्रमाणे अनेक दुर्मिळ काव्यसंपदा ही लोकांना उपलब्ध करून दिली आहे.

तसेच “रंगपंढरी” या कार्यक्रमात तिने नाट्यसंस्कृतीचे अतिशय सुंदर दर्शन घडवून आणले आहे. हे सर्वकाही करताना तुला एवढ्या वर्षांत एखादे नाटक, मालिका व सिनेमा का बरं करावा वाटले नाही, असे तिला विचारले असता ती म्हणाली की,”काही वर्षांपूर्वी मालिकांमध्ये व नाटकांत दाखवली जाणारी पुरूषप्रधान संस्कृती मला मुळीच पटत नव्हती. तसेच दागदागिने व सुंदर साड्या घालून किचनमध्ये काम करणारी स्त्री मला आवडत नव्हती. म्हणून मी नाटक- सिनेमां पासून दूर राहिले. परंतु अरुंधतीची मालिका केल्यावर तिला आपण खूप मिस केलंय असे वाटत आहे. पण आता मला अजून खूप काम करायचयं.”

See also  मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे दुबईमधील घर पहिले आहे का? हे घर आहे खूपच आलिशान आणि सुंदर...

“आई कुठे काय करते” या मालिकेतील अरुंधतीने आता अनिरुद्ध ला घटस्फोट दिला आहे. ती आता स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे. तिच्या आयुष्यात जुना मित्र पुन्हा आल्याने अनिरुद्ध ला मात्र ते पचत नाही. त्यामुळे तो तिच्याविषयी खूप पझेसिव्ह होत चालला आहे. तर आता अनेकजण म्हणतात की अनिरुद्ध संजनाला सोडेल आणि अरुंधतीला आपल्या आयुष्यात आणेल. तर दुसरीकडे काहीजण म्हणतात की अरुंधती पुन्हा अनिरुद्धकङे परत जाणारच नाही. अशाप्रकारे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने आपल्या मालिकेचा शेवट कशाप्रकारे होईल, हे सांगितले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment