13 कोटीला प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर एका गुजरात्याकडून विकत घेतलेल्या ‘मन्नत’ची आज आहे एवढी किंमत

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

गेल्या एक महिन्यात बॉलिवूड किंग बादशाह शाहरुख खान जरी आपल्याला पोरगं आर्यन खान च्या ड्रग्स प्रकरणामुळे जरी जास्त चर्चेत आलेला असला तरीही त्याच्या वाढदिवशी किंवा कायमच चाहत्यांच्या प्रेमात तो कायम असाच चर्चेत असतो. आर्यन खान ड्र’ग्स प्रकरणात अडकला काय आणि जेलमध्ये जाऊन 28 ऑक्टोबर ला बाहेर आला काय. तरीही शाहरुख च्या इज्जतीत काहीच फरक पडला नसल. कारण शाहरुख खान ला मानणारा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

हे सगळं सांगण्याचा अट्टहास म्हणजे आज 2 तारीख दिवाळी आणि शाहरुख खान चा वाढदिवस. लाखो करोडो हृदयावर राज्य करणारा शाहरुख खान आजच्या दिवशी काहीच काम करत नाही.फक्त मन्नत या त्याच्या निवासस्थानी असतो. कारण तिथं लाखो चाहते देशभरातून भेटायला येतात आणि मग त्यांना ही एक झलक देण्यासाठी शाहरुख अधून मधुन दिवसभरात बाहेर येत असतो.

शाहरुख चा वाढदिवस हा त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या सणा पेक्षा सुद्धा काही कमी नसतोच. आज ही आर्यन खान ड्रग्स प्रकरणी सुटल्यानंतर सुद्धा शाहरुख च्या मन्नत बाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी होईल. कारण आजही पहिल्या इतकंच त्यावर प्रेम आहे सर्वांचं.शाहरुख खान कुठं राहतो ? तर मन्नत मध्ये. आणि मन्नत म्हंटलं की शाहरुख खान असं एक प्रसिद्ध समीकरणच झालेलं आहे. रिक्षा वाल्याला जरी विचारलं ना की मन्नत ला सोडशील का ? तर तोही बेधडक सोडायला बसलाय.

See also  लाखोंच्या हृदयाची धडकन असणारी ही प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकणार लग्न बंधनात, नाव ऐकून थक्क व्हाल!

पण हे मन्नत शाहरुख ने खूप कष्टाने मिळवलेलं आहे. जे दिसतं तेवढं सोप्प नव्हतं. पण इथे अभिनेत्याने कष्ट खूप केले. अनेक दर्जेदार सिनेमे देऊन, पैसे कमावून हे एवढं मोठं घर मुंबईत घेतलं आहे. हे घर खूपच अलिशान आहे. आणि महागडं सुद्धा. चारही बाजूने गेट आहे.

पण तुम्हाला हे माहिती आहे का ? मन्नत कश्या प्रकारे शाहरुख च्या पदरी पडलं ? किंग खान शाहरुखने मन्नत हे घर पहिल्यांदा 1997 मध्ये येस बॉस या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पाहिले होते. पाहताच त्याच्या डोळ्यात हे घर घर करून बसलं. तिथंच मनामध्ये शाहरुख ने या मन्नत ला स्वतःचे करायचेच असं जिवंत स्वप्न पाहिले होते. पण, त्यावेळी मन्नत हे घर गुजराती व्यापारी नरिमन दुबास यांच्या मालकीचं होतं.

See also  गोविंदाने दिलेल्या या भेटवस्तूचा अभिनेता राजकुमार यांनी नाक साफ करण्यासाठी केला होता वापर; सर्व प्रकार ऐकून शॉक व्हाल!

शाहरुख ने खरेदी करून नव्याने घर बांधण्याआधी आजच्या मन्नतचे नाव व्हिला व्हिएन्ना असे होते. पण, मेहनत आणि संघर्षाच्या समर्पणाच्या जोरावर शाहरुखने अखेर हे घर आपल्या नावावर केलेच. 2001 मध्ये शाहरुख व्हिला व्हिएन्नाच्या मालकाला भेटला. या भेटीनंतर शाहरुखने हा बंगला बाई किशोरेश भानू संजना ट्रस्टकडून विकत घेतला. शाहरुख खान या अभिनेत्याने प्रथम बंगल्याचे नाव जन्नत ठेवण्याचा विचार केला होता, परंतु नंतर मात्र नाव मन्नत ठेवले. तर विकत घेऊन नाव ठेवण्याचा असा आहे प्रवास.

किती कोटी ला घेतला होता बंगला ? करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये संघर्ष करून इंडस्ट्रीत योग्य स्थान मिळवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान ने हा बंगला 13.32 कोटी रुपयांना खरेदी केला होता.

या बंगल्याची रचना कशी होती ? आणि आज आहे. या बंगल्याची रचना 20 व्या शतकातील ग्रेड-3 हेरिटेज सारखी रूपकात्मक आहे, सर्व बाजूनी बंगल्याला दरवाजे आहेत. आत ही खूप अलिशानता आपल्याला दिसून येईल. आणि त्यासोबतच शाहरुख ने बाहेरून सुद्धा त्याला राजवाड्या टाइप रूप दिलेलं आहे. नाय नाय म्हंटलं तरी 13 कोटी ला घेतलेला बंगला मन्नत 200 कोटी ला जाऊ शकतो.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्याने सुपरस्टार राजेश खन्नाच्या लगावली होती कानशिलात, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही!

किती मजले आहेत ? मन्नत हा 6 मजल्यांचा बंगला आहे. समुद्राभिमुख मन्नत हा बंगला बँडस्टँड, वांद्रे पश्चिम, मुंबई येथे आहे.  हा पत्ता देशभरातून येणाऱ्या सर्व चाहते पर्यटक यांना आज माहीत आहे. मुंबईत सुद्धा. मन्नतचे इंटीरियर डिझायनिंग शाहरुख खानची पत्नी गौरी खानने स्वतः केलेले आहे. गौरीने हे घर 1920 च्या दशकानुसार डिझाइन केले आहे. ज्यामुळे ते आतून बाहेरून फार आकर्षक दिसत आहे.

शाहरुख चा स्ट्रगल काही साधा सोपा नव्हता !… शाहरुखने दिल्लीहून मुंबईत येऊन टीव्हीवरील ‘सर्कस’ आणि ‘फौजी’सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये उत्कृष्ट असं काम केलेलं. पुढे चित्रपट इंडस्ट्रीत सुद्धा आज मोठं नाव स्थापित केलं आहे. बादशाह किंग खान शाहरुख ला वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा !…..

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment