ही मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार लग्न बंधनात, तिच्या साखरपुड्याचे फोटोज् तुम्ही पाहिलेत का?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी सिनेविश्वात हल्ली बरेच कलाकार बोहल्यावर चढताना दिसत आहेत. महेश कोठारे निर्मित दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेत चोपङाईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सई कल्याणकर हिचा नुकताच साखरपुडा पार पडला. याव्यतिरिक्त सईने इतर अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केले आहे. झक्कास या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी सोबत ती झळकली होती.

अभिनेत्री सई कल्याणकर ही एक उत्कृष्ट नृत्यांगना असून तिने भरतनाट्यम विशारद मिळवली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील “तुझे नी माझे घर श्रीमंताचे” ह्या मालिकेतून तिने उत्कृष्ट भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वीच सई कल्याणकर हिने प्रशांत शिवराम चव्हाण यांसोबत साखरपुडा झाल्याचे सोशल मीडियावर फोटोज् शेयर केले होते. हे फोटोज् पाहून तिच्या चाहत्यांनी देखील अनेक शुभेच्छा तिला पाठवल्या होत्या.

See also  मराठी खलनायिका एका भागासाठी घेतात इतके मानधन...जाणून घ्या मानधनातली रक्कम

251671908 217565407129587 4799483440635182800 n

सईचा होणारा भावी पती हा पेशाने ङॉक्टर आहे. ङॉ.प्रशांत चव्हाण यांनी नॅनो केमिस्ट्री विषयातून पीएचडी केली आहे. सई व प्रशांत यांचे हे अरेंज मॅरेज आहे. साखरपुडा समारंभात त्यांनी अतिशय कमी लोकांना आमंत्रित केले होते. सईने अजूनतरी आपल्या लग्नाची तारीख सांगितली नाही. तरीही येत्या काही दिवसांतच ते दोघेही एकमेकांसोबत सप्तपदी घेणार आहेत.

251093994 304311014868631 2836525396473889439 n

अभिनेत्री सई कल्याणकर ही झी युवा वरील फ्रेशर्स या मालिकेत सुद्धा होती. त्याचबरोबर कलर्स मराठी वाहिनीवरील “गणपती बाप्पा मोरया” या मालिकेतून तिने सिद्धीची भूमिका साकारली होती. तसेच भेटी लागी जीवा या मालिकेतून तिने अप्रतिम व्यक्तिरेखा साकारली होती. आपल्या लोभस अभिनयाने तिने एकापाठोपाठ एक अशा मालिका मिळवल्या आहेत. मालिका, चित्रपट आणि नाटकांत काम करून सईने आपला चांगलाच जम बसवलेला दिसतो.

See also  "अजूनही बरसात आहे" मालिकेतील मनस्विनीची भूमिका गाजवणाऱ्या अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्याबद्दल माहितीये?

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment