अबब ! या मराठमोळया अभिनेत्रीने आपल्या सासरी बनवल्या चक्क चुलीवर चपात्या, पाहा तिचा व्हिडीओ…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“बघतोय रिक्षावाला गं वाट माझी बघतोय रिक्षावाला” या गाण्यावर आपोआपच पाय थिरकू लागतात. या गाण्याने अखंड महाराष्ट्राला मनसोक्त नाचायला भाग पाडले होते. अर्थातच अभिनेत्री मानसी नाईक ही आहेच तितकी अदाकारी आणि लावण्यवती…तिच्या प्रत्येक गाण्यावर आपण ताल धरून नाचतो. आपल्या उत्कृष्ट नृत्याच्या जोरावर तिने प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर केलं आहे.

आपल्याला तर ठाऊकच आहे की, आपल्या मनमोहक दिसणाऱ्या मानसीने नुकतेच काही महिन्यांपूर्वी प्रदीप खरेरा सोबत लग्न केले आहे. सोशल मीडियावर मानसी आपल्या पती सोबतचे फोटोज् आणि व्हिडिओज नेहमीच शेयर करते. सध्या मानसी आपल्या सासरी फरिदाबादला असून ती तेथील आपले लेटेस्ट फोटोज् व व्हिडिओज सुद्धा फॅन्ससाठी शेयर करते.

हल्लीच तिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक नवीन व्हिडीओ शेयर केला आहे. ज्यामध्ये ती चुलीवर चपाती बनवताना दिसत आहे. आपल्या इन्स्टा अकाउंटवर हा व्हिडीओ शेयर करत तिने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की,”भूख का रिश्ता तो सिर्फ रोटी से है, चमकती थालियाँ भूख नहीं मिटाती”. तिने पुढे लिहिले आहे की, “मी माझ्या सासरी चुलीवर चपात्या बनवायला शिकली.” मानसी च्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांच्या अनेक लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

See also  अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिचा साखरपुडा सोहळा संपन्न, या प्रसिद्ध व्यक्तीसोबत लवकरच होणार ती विवाहबद्ध

एका युजरने तर कमेंट मध्ये लिहिले आहे की,”वाह किती छान…तुम्हांला कशाचा गर्व, अभिमान नाही. तुम्हांला चुलीवर च्या चपात्या बनवताना खूप आश्चर्य वाटत आहे. कारण आजकालच्या मूलींना तर ते सुद्धा करता येत नाही.” तर दुसर्या युजरने लिहिले आहे की,”खूप छान मानसी ताई.. तू खरंच खूप सुंदर दिसतेस या लुकमध्ये….माझी आवडती अभिनेत्री आहेस तू. लव्ह यू दी…” तर आणखी एका युजरने लिहिले आहे की,”खूपच गोड…एकच नंबर मानसी ताई.” अभिनेत्री मानसी नाईक ही फरिदाबादला आपल्या दिराच्या लग्नासाठी गेली आहे. तेथील फोटोज् आणि व्हिडिओज सुद्धा तिने सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  आपल्या जन्मदात्यांसाठी अभिनेता भरत जाधवने केले असे काही, जे ऐकून तुमच्या देखील डोळयांत पाणी येईल...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment