ऐश्वर्या रायच्या मुलीसोबत सोबत घडला हा गैरप्रकार, जाणून घ्या नेमकं काय घडलं…
विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय व अभिनेता अभिषेक बच्चन यांची गोङ मूलगी “आराध्या” हिच्यावर अगदी सर्वांच्या नजरा टपलेल्या असतात. आराध्याला कधी तिच्या ङ्रेसिंग स्टाईलमुळे तर कधी चालण्याच्या स्टाईलमुळे नेहमीच ट्रोल केले जाते. मात्र यावेळी अभिषेक बच्चनने आपल्या लहानशा परीची निंदा करणाऱ्या ट्रोलर्सना चांगलेच खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे.
आपल्या एका मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन ने आराध्याला ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच घेरले आहे, त्याने म्हटले आहे की, “हे कोणत्याही प्रकारे सहन करू शकत नाही आणि सहन केले जाऊ शकत सुद्धा नाही. मी एक पब्लिक फिगर आहे, ठीक आहे. मात्र माझी मूलगी या सर्व गोष्टींपेक्षा खूप वेगळी आहे. तुम्हांला काही बोलायचे असेल, तर माझ्या तोंडावर सरळ बोलून दाखवा.”
एक वडील म्हणून आपल्या मूलीची काळजी वाटणे, हे अभिषेक बच्चन साठी योग्य आहे. कारण आपल्या मुलांची काळजी करणे, त्यांचे व्यवस्थित पालनपोषण करणे, हे आईवडिलांचे प्राथमिक कर्तव्य आहे. अभिषेक बच्चन विषयी म्हणायचे झाले, तर तो लवकरच “बॉब बिस्वास” या क्राईम थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे.
यामध्ये अभिषेक एका कॉन्ट्रॅक्ट किलर बॉब बिस्वासची भूमिका साकारताना दिसणार आहे. या व्यक्तिरेखेसाठी अभिषेक ने आपले कितीतरी किलो वजन वाढवले आहे. या मुलाखतीत अभिषेक बच्चन ने बॉब बिस्वास बनण्याच्या त्याच्या मानसिक प्रकियेविषयी सांगितले आहे. या भूमिकेत येण्यासाठी तो वजन वाढवण्यावर ठाम आहे. अभिषेकने सांगितले होते की,”या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याने आपले 105 किलो पर्यंत वजन वाढवले होते. ही व्यक्तिरेखा अगदी खरीखुरी दिसावी, म्हणून त्याला प्रोस्थेटिकचा आधार न घेता वजन वाढवणे सोयीस्कर वाटले.”
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.