“या” व्यक्तीने सर्वांसमोर अभिनेत्री शिल्पा शेट्टीची खिल्ली उडवली, जाणून घ्या तो आहे तरी कोण?
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर खूप एक्टिव असते. आपला ग्लॅमरस लुक ती चाहत्यांसाठी शेयर करत असते. सध्या शिल्पा शेट्टीचा एक असा व्हिडीओ वायरल होत आहे, जो पाहिल्यावर लोक तिची खिल्ली उडवत आहेत. परंतु हा व्हिडीओ मस्करीत शूट करण्यात आला आहे. या व्हिडिओ मध्ये मनोज आणि शिल्पाची जोङी पाहायला मिळत आहे.
“इंङियाज गॉट टॅलेंट” चा नववा सीझन 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या शो च्या शूटिंग दरम्यान शिल्पा आणि मनोज हे खूप मस्ती करताना दिसत आहेत. सेटवरून ह्या दोघांचाही व्हिडीओ समोर आला आहे. जो सध्या चांगलाच वायरल होत आहे. शिल्पा च्या या व्हिडिओवर युजर्स च्या बर्याच प्रतिक्रिया येत आहेत. खरंतर या व्हिडिओमध्ये मनोज हा शिल्पा शेट्टीला टोमणे मारताना दिसत आहे.
मनोजने केली अशी मस्करी :
सोनी टिव्हीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँङलवरून हा व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडिओ मध्ये ती बदाम खाताना दिसत आहे. त्याच्यावर मनोज तिला म्हणतो की,”शिल्पा, बुद्धी ही बदाम खाऊन येत नाही. धोका खाल्ल्यानंतर येते. यावर शिल्पा बराच वेळ विचार करून म्हणते की,”अच्छा म्हणजे तू बदाम नव्हे तर धोके खातोस.” अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे हे उत्तर ऐकून मनोज चा चेहरा हिरमुसतो.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.