टिकटॉक नाव बदलून लवकरच भारतात परतण्याच्या तयारीत, ‘या’ नावाने पुनरागमन करण्यास सज्ज

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

नवी दिल्ली: मागील वर्षी सुरक्षा आणि गोपनीयता भंगाचे कारण देत केंद्र सरकारने शेकडो चीनी अॅप्सवर बंदी घातली होती. भारत सरकारने बंदी घातलेल्या अॅप्सपैकी टिकटॉक हे फार लोकप्रिय अॅप होते. भारतातील कोट्यवधी लोक या अॅपचा वापर करत होते. दरम्यान, एक मोठी बातमी समोर येत आहे. टिकटॉक भारतात परतण्याची तयारी करत आहे. मात्र, यावेळी टिकटॉक(TikTok) चे नाव बदलून ‘TickTock” असं ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.

ट्रेडमार्कसाठी अर्ज दाखल

News18 च्या वृत्तानुसार टिपस्टर मुकुल शर्मा यांनी सांगितले की, टिकटॉकची मालकी असलेली कंपनी बाइटडान्सने (ByteDance) जुलैच्या सुरुवातीला पेटंट, डिझाइन आणि व्यापार चिन्हांच्या नियंत्रक जनरलकडे TickTock साठी ट्रेडमार्क दाखल केला होता.

See also  'या' कारणांमुळे प्रकाश आंबेडकर पुढील 3 महीने सक्रिय राजकारणापासून राहणार दूर

PUBG ने केले पुनरागमन

वर्षभरानंतर पबजी मोबाइल गेमने नाव बदलून भारतात पुनरागमन केले. यावेळी त्यांनी भारतातील सर्व नियम पाळण्याची हमी दिली. भारतीय वापरकर्त्यांची माहिती भारतीय सर्व्हरवरच जतन करण्यात येत आहे. पबजीने बैटलग्राउंड मोबाइल इंडिया (BGMI) या नावाने भारतात पुनरागमन केले आहे.

बाइटडान्सने (ByteDance) 6 जुलै रोजी TickTock ट्रेडमार्क मिळवण्याकरता अर्ज केला आहे. यासोबतच त्यांनी नवीन भारतीय आयटी नियमांचे पालन करण्याची तयारी दाखवली. बाइटडान्स कंपनीच्या सूत्रांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, कंपनी भारत आणि अमेरिकेत लागू झालेले नवीन आयटी नियम पाळण्यास तयार असून, पुन्हा भारतात कार्यरत होऊ पाहत आहे. लवकरच कंपनी केंद्रसरकार सोबत चर्चा करणार असल्याचे समजते. टिकटॉक नेमकं कधी परत येईल याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही.

See also  पेगासस स्पायवेअर नेमकं काय आहे, ते कसे कार्य करते, त्याच्या पासून बचाव कसा करावा? जाणून घ्या एक क्लिकवर

भारतासह अमेरिकेने सुद्धा चीनी अॅप्स वर कठोर निर्बंध लावण्याचा मसुदा तयार केला होता. मात्र, चीनी अॅप्सवर पुर्णपणे बंदी न आणता अगोदर वापरकर्त्यांच्या गोपनीयतेची आणि माहितीच्या सुरक्षिततेची समीक्षा करणार आहेत.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment