टिकटॉकने दिला गुलीगत धोका! टिकटॉक स्टार सूरज चव्हाण म्हणतोय सरकारने टिकटॉक बॅन करून…
.
कला हा असा प्रकार आहे की तो जर का एकदा अंगात भिनला तर मग त्याचं वेड लागल्याशिवाय राहत नाही. बरं हे एक असं वेड आहे की ते यशाला गवसणी घालवून देतं. कला जगायला, लढायला शिकवते. डॉक्टर, इंजिनिर किंवा इतर हजारामध्ये असतात पण कलाकार हा लाखात एक असतो. कलेची सेवा करायला मिळणं हे खरंच नशीबचं !…
आज अनेक कलाकार आपापल्या परीने कला जगवत स्वतःही आनंदाने जगत आहेत. नाटक, सिनेमा, आणि इतर अश्या अनेक कला आहेत. पण या सगळ्याध्ये सध्या टिकटॉकवर कमी वेळात आपली झलक दाखवणारी सुद्धा एक नवीन कला जन्माला आली आहे. यात गरीबातला गरीबही आणि श्रीमंतातील अति श्रीमंत सुद्धा सहभागी होऊन कलागुणांना वाव देऊ शकतो.
गरिब असलो म्हणून काय झालं ? पण माझी कला मला हीच माझी श्रीमंती आहे. असं म्हणणारा बारामती तालुक्यातील एका छोट्याशा गावातला एक कलाकार सध्या टिकटॉक वर खूप व्हायरल होत आहे. सूरज चव्हाण हे त्याचं नाव आहे. SQ,RQ, ZQ , ब्रँड इज ब्रँड, गुलीगत, बुक्कीत टेंगुळ अश्या अनेक ग्रामीण लहेजा डायलॉगने महाराष्ट्र मध्ये त्यानं खूप प्रसिद्धी मिळवली.
अनेकांनी त्याला आर्थिक स्वरूपाची मदत ही केली. त्याला आईवडील नाहीत. घरी चार बहिणी आहेत. राहायला नीट घर नव्हतं पण अनेक टिकटॉक स्टार सूरज प्रेमी लोकांनी त्याच्या घराचं काम सुरू केलं आहे. अनेक लोकं त्याला लांबून गावात भेटायला यायची. पण म्हणतात ना की जीवन हे एक चढ उतार असणारा रस्ता आहे. तिथं अनेक अडचणींनीची वळणे आल्याशिवाय राहत नाही. ज्या टिकटॉक वर गोलीगत फेमस झाला ते होतं चीन चं.
सध्या एकतर भारत चीन लडाख आणि गलवान घाटी येथे वादविवाद सुरू आहे. त्यामुळे भारताने काही दिवसांपूर्वी चीनचे ५९ ऍप बंद केले. त्यांना ब्यान करून टाकलं. त्यात टिकटॉक ही गेलं. सूरज ला आत्ता कुठं जगण्याचा नवा मार्ग सापडला होता पण तो ही काट्याने भरला. तो व अनेक टिकटॉक स्टार निराश झाले.
पण सूरज चव्हाण म्हणतो की टिकटॉक ने जरी मला गोलीगत धोका दिला असला तरीही माझ्या साठी देश सर्व प्रथम आहे. मी याला सहमत आहे. माझ्या देशाच्या जवानांना सलाम. हे ऐकून तुम्हालाही लक्षात आलं असेल की सूरज एक सच्चा देशप्रेमी आहे. आज उद्या भारत ऍप नक्की बनवेल. तेव्हा मी पुन्हा वेगानं सक्रिय होईल असंही तो म्हणत आहे.
आधी देश आणि मग बाकीचं ही सूरज ची भूमिका खरचं खूप प्रेरणादायी आहे. निराश न होता आता आनंदाने जगायचं असं तो म्हणतो. आपल्या कलेनं साऱ्या महाराष्ट्र भर लोकांचं मनोरंजन करणाऱ्या सूरज ला पुढील वाटचाली साठी खूप साऱ्या शुभेच्छा !…