अरेंज मॅरेज करताना करताना करा फक्त हे काम, लव्ह मॅरेजवाल्यांपेक्षा देखील सुखी आयुष्य जगालं…
“लगीनसराईचा मौसम हा आला, तुझ्या- माझ्या प्रेमाचा सुगंध दरवळला “. मित्रांनो लग्न म्हटले की, थोङे टेन्शन तर येते आणि जर अरेंज मॅरेज असेल तर मात्र आणखी भीती वाटते. आपला पार्टनर कसा असणार, त्याच्या आवडीनिवडी, सवयी इत्यादी अनेक गोष्टी आपल्याला सतावतात. सर्व काही जाणून घेण्याची आपल्यात एक उत्सुकता असते.
बहुतेक लोकांना अरेंज मॅरेज म्हणजे आयुष्यात आपण कसेतरी निभावण्याचा प्रयत्न करत आहोत, असेच वाटते. मात्र तुम्हांला माहित आहे का, तुम्ही जर ठरवले तर अरेंज मॅरेज रिलेशन देखील लव मॅरेज सारखे बनवू शकता. यासाठी आम्ही तुम्हांला काही छान ट्रिक्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे अरेंज मॅरेज हे लवमॅरेज पेक्षा देखील खूप सुंदर होईल. या ट्रिक्स नक्की करून पाहा :
सर्वांत पहिल्यांदा मैत्री करा : पती – पत्नी व गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंड हे काही काळानंतर बोर होऊ लागतात. परंतु आपले मित्र- मैत्रीण हे मात्र कधीच बोर होत नाहीत. त्यांच्यातील मैत्री ही अगदी वर्षांनुवर्षे चालू राहते. तसेच मैत्री करताना आपण जास्त भाव देखील मुळीच खात नाही. एकमेकांच्या चुका खूप सहजतेने स्वीकारतात. या अरेंज मॅरेज असले तर सर्वांत अगोदर आपल्या पार्टनरला आपला छान मित्र बनवा. त्यानंतर मग तुमच्या नात्यात प्रेमाचे अंकुर फुटण्यास हळुवार सुरुवात होईल.
धैर्य व सहनशीलता ठेवा : प्रेमाचे नाते हे खूपच बेचैन करणारे असते. हे कुणाला अगदी एका नजरेत पाहताच होते, तर काहीजण मात्र अनेक वर्ष झाले तरी विचार करत राहतात. यासाठी अरेंज मॅरेज झाल्यावर धैर्य अवश्य ठेवा. घाईघाईत एखाद्या गोष्टीवर नाराज होऊन कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये. एकमेकांना व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा व एकत्रित जास्त टाइम स्पेन्ङ करा. एक दिवस तर तुमच्या दोघांत प्रेम अवश्य खुलून येईल.
काळजी घ्यायला शिका : आपल्या लाइफ पार्टनर सोबत सुख- दुःख शेयर करायला शिका. तुम्ही त्यांची काळजी घेण्यास सुरुवात केली तर ते सुद्धा आवर्जून तुमची काळजी घेतील. अशाप्रकारे तुमच्यामध्ये प्रेम कधी वाढेल, हे तुम्हांला देखील समजणार नाही.
एकमेकांचा मनापासून स्वीकार करा : तुम्ही जसे आहात, तसेच छान आहे. जर तुम्हांला आपल्या पार्टनरची एखादी सवय आवङत नसेल, तर त्यांची ती सवय बदलण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. ते जसे आहेत, तसेच त्यांना स्वीकारा. स्वतःमध्ये देखील व्यवस्थित निरीक्षण करा. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी कमी असतेच. यासाठी एकमेकांसोबत एङजस्ट करून जगायला शिका.
एकमेकांचा आदर करावा : नाते कोणतेही असो, जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीचा आदर करता, तेव्हाच तुमचा देखील आदर केला जातो. प्रत्येकाला स्वतःचा स्वाभिमान असतो. यासाठी तुम्ही देखील आपल्या पार्टनरचा आदर करायला शिका.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.