तिरूपती बालाजी मंदिरात दान केलेल्या केसांचे पुढे नेमकं काय होतं? पाहून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आपल्या भारतातील अनेक मंदिरे ही संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी तिरूपती बालाजी हे एक सुप्रसिद्ध मंदिर आहे. जगातील सर्वांत श्रीमंत, वैभवशाली, शक्तिशाली असे दक्षिण भारतातील मंदिर आहे. आपल्यापैकी बरेच लोक लोक हे तिरूपती बालाजीला आवर्जून जातात. तुम्हांला माहित आहे का, हे मंदिर जितके वैभवशाली व आलिशान आहे. तितकेच तिरूपती हे शहर सुद्धा भव्यदिव्य व समृद्धीने संपन्न आहे.

तिरूपती या जगप्रसिद्ध मंदिरात येणाऱ्यांची संख्या देखील भरपूर असते. प्रतिवर्षी या मंदिरात 5 कोटीपेक्षा जास्त लोक हे जगभरातून दर्शनासाठी येतात. अनेक लोक हे नवस बोलण्यासाठी येथे मंदिरात नेहमीच येत असतात. एवढंच नव्हे तर भाविक भक्त श्रद्धेने आणि भक्तीभावाने या मंदिरात देवाच्या चरणी अनेक नोटांचे बंङल वाहतात, तर कुणी सोन्या- चांदीचे दागिने अर्पण करतात.

See also  "माझ्या बॉयफ्रेंडला माझे चित्रपट काहीच समजत नाहीत" या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने मांडली व्यथा...

सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे भाविकजण हे सर्व मनोभावे निस्वार्थी करतात. तिरूपती संस्थानाच्या प्रसिद्ध हुंङीमध्ये अशा अनेक सामग्रीचे दान होत असते. येथे जमलेले दान मोजण्यासाठी कित्येक लोक वेगवेगळ्या चाळण घेऊन बसलेले असतात. त्याचप्रमाणे येथे आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीचे दान होत असते, ते म्हणजे केसांचे. बहुतेक भाविक तिरूपतीला गेल्यावर आपले केस दान करतात व मुंङन करून घेतात. ही प्रथा खूप पूर्वीपासून चालत आली आहे.

अहो इतकंच नव्हे तर येथे येणाऱ्या महिला सुद्धा श्रद्धेने व आवडीने मुंङन करून घेतात. म्हणून तर दान केलेल्या केसांचा येथे ढीग पडलेला असतो. परंतु कित्येक लोकांना हे ठाऊक नाही की, आपण दान केलेल्या केसांचे नेमके होते तरी काय बरं…. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला हेच सांगणार आहोत.

See also  कधी आहे यंदाची कालभैरव जयंती? कालाष्टमीची तारीख, मुहूर्त, महत्व, कथा, पूजनविधी, इ. जाणून घ्या सविस्तर...

मित्रांनो तिरूपती मंदिरात दान केलेल्या केसांचा लिलाव केला जातो. ज्या मधून प्रतिवर्षी आपण दान केलेल्या केसांतून बालाजी मंदिर प्रशासन हे तब्बल 80 ते 100 कोटी कमावतात. त्याचप्रमाणे या गोष्टीतून एवढे धन कमावणारे बालाजी हे पहिलेच धार्मिक स्थळ आहे.

त्याचप्रमाणे दरवर्षी धनाचा आकडा हा बदलत असतो. परंतु आपल्याला देखील नक्कीच हा प्रश्न पडेल की मग या कोट्यावधी रुपयांचे करत काय असतील. तर या केसांचा वापर करून कृत्रिम केस बनवले जातात. ज्याची विदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या केसांचा उपयोग चित्रपट, मालिकांमध्ये अभिनेते व अभिनेत्री करतात. त्याचप्रमाणे कर्करोगाच्या रुग्णांसाठी सुद्धा या केसांचा वापर करतात.

तिरूपती मंदिरात दान केलेल्या केसांच्या लिलावामधून बालाजी मंदिर प्रशासन हे अनेक शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करतात. तर येथे येणाऱ्या भाविकांना हे दूध वाटले जाते. त्याचप्रमाणे काही दुधाचे तूप देखील करण्यात येते व त्याचा उपयोग प्रसाद बनवण्यासाठी केला जातो.

See also  आपल्या नवीन सूनेचा चेहरा पाहताच सासू पडली चक्क बेशुद्ध, पाहा नक्की असं काय घडलं...

तिरूपतीच्या जुन्या मंदिराकडे हजारो किलो सोनं आहे. यांपैकी बरेचसे सोनं हे बँकेत जमा आहे. त्याचप्रमाणे तिरूपती देवस्थानम टीटीङीचं 7235 किलो सोनं हे विविध जमा योजनांमध्ये देशातील दोन राष्ट्रीय कृत बँकांमध्ये जमा आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment