“तारक मेहता…” मधील जेठालालची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे खूपच सुंदर, फोटो पाहून थक्क व्हाल!

“तारक मेहता का उलटा चश्मा” या मालिकेतला एकमेव दर्जेदार विनोदी अभिनेता म्हणजे जेठालाल या व्यक्तिरेखेचा चेहरा. या पात्राची व्यक्तिरेखा साकारली ती अभिनेते दिलीप जोशी यांनी. दिलीप जोशी यांनी अगोदर हिंदी सिनेमांमधेही चांगल्या भुमिका पार पाडल्या आहेत.

परंतु तारक मेहता का उलटा चश्मा मधील जेठालाल या पात्राने त्यांना जगभरात पोहोचवलं. या मिलकेच्या एकूण सर्व कथानकाचा मुळ गाभा अथवा सेंटर पॉईंट जर कोण असेल तर तो निश्चितच जेठालाल आहे. जेठालालच्या आयुष्यात नाना तऱ्हेची संकटे येत राहतात आणि आपले प्रिय मित्र अर्थात जेठालालचे फायर ब्रिगेड असणारे तारक मेहता हे पात्र त्याच्या मदतीला धावून येते.

तर जेठालाल या विनोदी आणि आपल्या अभिनयातून निखळ भुमिका पार पाडणाऱ्या दिलीप जोशींना आज तमाम रसिकप्रेक्षकांच प्रेम इतकं भरभरून मिळत आहे की, त्यांना थेट चक्क सोशल मीडियावर स्वत:च अकाऊंट बनवून उपलब्ध व्हावं लागलं.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण दिलीप जोशी आजवर इन्स्टाग्राम अकाउंटवर कधीच नसायचे परंतु मालिकेच्या चाहत्यांमधील मागणीमुळे त्यांना गेल्या वर्षात इन्स्टाग्रामवर स्वत:च अकाउंट काढावं लागलं.

दिलीप जोशी आपल्या जेठालाल या पात्राच्या निरागसतेच्या आणि बबीताजींवर क्रश असल्याच्या भावनांनी प्रेक्षकांचं मन असं काही जिंकून घेतात की फक्त त्यांनाच टिव्हीवर पाहत रहावंस वाटतं. तर अशा खुप मोठ्या फॅनक्लबचे मुळ केंद्र असणाऱ्या दिलीप जोशींविषयी आज आपण काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

दिलीप जोशी आजवर लाईमलाईटपासून दूर राहिले होते परंतु नुकतेच ते सोशल मीडियावर आले आणि पाहता पाहता त्यांच्या फाॅलोवर्सचा टप्पा १ मिलीयनच्याही पुढे गेला. दिलीप जोशींचा जन्म हा १९६८ सालात झाला.

दिलीप जोशींच्या पत्नीच नाव जयमाला जोशी हे आहे. आणि त्यांनादेखील रूपेरी दुनियेपासून दूर रहायलाच आवडते. जेठालाल आणि त्यांच्या पत्नी जयमाला यांच्या लग्नाला सबंध २० वर्ष उलटली आहेत. आणि त्या दोघांचा संसार अगदी खुशमिजाज रंगात सुखरूपरित्या चालू असलेला पहायला मिळतो आहे.

दिलीप जोशी यांना दोन मुलेदेखील आहेत ज्यांपैकी एक मुलगी तिचे नाव “नियती” तर दुसरा मुलगा त्याचे नाव “रित्वीक” असे आहे. मालिकेच्या धकाधकीच्या आणि व्यस्त शेड्युलमधेही दिलीप जोशी आपल्या लाडक्या कुटुंबीयांसाठी हमखास वेळ काढतात आणि त्या सर्वांसोबत क्वालिटी टाईम घालवतात.

दिलीप जोशी यांनी नेमकंच काही दिवसांपूर्वी आपल्या स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आपल्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर या फोटोंची सोशल मीडियावर क्षणार्धात सर्वत्र तुफान शेअरिंग आणि चर्चा उठली होती. दिलीप जोशी यांच्याबद्दल सांगायचचं झालं तर ते आर के नारायण यांचे मोठे चाहते आहेत. शिवाय त्यांनी अनेक नाटकांमधून विविध प्रकारच्या व्यक्तिरेखादेखील आजवर साकारल्या आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment