“तारक मेहता…” मधील गडा इलेक्ट्रॉनिक्सचा खरा मालक आहे हा व्यक्ती, जाणून घ्या कोण आहे तो व्यक्ती…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“तारक मेहता का उल्टा चश्मा” ही सुप्रसिद्ध मालिका मागील कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ही मालिका सर्वांची फेवरेट बनली आहे. यामधील जेठालाल गङा यांचे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान तर आपल्याला सर्वांना माहित आहे. परंतु ते दुकान नक्की कुणाचे आहे, हे तुम्हांला ठाऊक आहे का? आज आम्ही तुम्हांला याविषयी सगळी माहिती सांगणार आहोत.

“तारक मेहता का उल्टा चश्मा” मधील जेठालाल गङा यांचे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान हे खूप प्रसिद्ध आहे. या दुकानाचे खरे मालक हे शेखर गङियार आहेत. मुंबईतील खार मध्ये हे दुकान आहे. शेखर यांनी भाड्याने हे दुकान मालिकेच्या शूटिंगसाठी दिले आहे. शेखर यांनी सांगितले की, सुरूवातीला या दुकानाचे नाव शेखर इलेक्ट्रॉनिक असे होते. पण मालिकेनंतर हे दुकान गङा इलेक्ट्रॉनिक्स म्हणून प्रसिद्ध झाले, तेव्हापासून त्यांनी गङा इलेक्ट्रॉनिक्स असेच नाव ह्या दुकानाचे ठेवले.

See also  'शाहरुख खानने माझं आयुष्य बर्बाद केलं' या महिलेने या शाहरुख खानवर लावला होता ध'क्कादायक आ'रो'प...

ह्या मालिकेत जेठालाल गङा हे हे दुकान सांभाळतात. दररोज सकाळी ते दुकानावर जाण्यासाठी निघतात. त्यामुळे ह्या दुकानाचा उल्लेख मालिकेत हमखास होतो. म्हणून तर मालिकेप्रणाणेच खऱ्या आयुष्यात सुद्धा गङा इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान प्रसिद्ध झाले आहे.

Dc1dCSNVQAEn61c

शेखर गङियार पुढे म्हणाले की, अगदी सुरुवातीला त्यांना दुकान भाड्याने देण्याची फार भीती वाटत होती. कारण शूटिंग करताना दुकानाचे काही नुकसान तर होणार नाही ना, याची भीती त्यांना सतावत होती. परंतु तसे काही घडले नाही. कारण ते खूप काळजीपूर्वक मालिकेची शूटिंग करतात. “तारक मेहता का उल्टा चश्मा” या मालिकेमुळे आता दुकानात ग्राहक कमी व पर्यटक जास्त येतात. तसेच लोक येथे आल्यावर फोटोज् घ्यायला अजिबात विसरत नाहीत.

See also  'लागीर झालं जी' मधील लोकप्रिय भैय्यासाहेब उर्फ किरण गायकवाड करतोय नव्या मालिकेत नवी भूमिका, जाणून घ्या कोणती आहे मालिका!

मागील कित्येक वर्षांपासून सुरू असलेली ही “तारक मेहता का उल्टा चश्मा” ही मालिका आपल्या देशभरातच नव्हे तर अख्ख्या जगभरात पाहिली जाते. टेलिव्हिजनवरील सर्वांत जास्त टीआरपी असणारी ही एकमेव मालिका आहे. 2008 साली या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. तर आजपर्यंत ही मालिका सुरू आहे.

shekhar gadiyar gada electr

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment