तृप्ती देसाई बिग बॉस मराठीतून बाहेर आणि आता करणार राजकारणात प्रवेश! तयारी सुरू…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मराठी मध्ये एक रियालिटी शो हिंदी आणि इतर भाषांमध्ये जेवढा लोकप्रिय आहे, तेवढाच सध्या गाजत आहे. आणि त्यामुळे टीआरपी मध्ये सुद्धा नेहमीच शो आघाडीवर आहे. त्या शो चं नाव आहे बिग बॉस. होय; पण बिग बॉस हिंदी नाहीतर मराठी. बऱ्याच दिवसांपासून या घरात बऱ्याच गोष्टी घडत आहेत. मराठी रसिक प्रेक्षकांना हा शो प्रचंड आवडत आहे. लक्ष वेधत आहे.

कारण काय तर या बिग बॉस मराठी या रियालिटी शो च्या घरातील सदस्य हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे ट्रेंडिंग व्यक्तिमत्त्व आहेत. ज्यामध्ये हिरो हिरोईन आहेत ज्या नाटक, सिनेमा आणि मालिका यामधून घराघरात पोचलेल्या आहेत. त्याचसोबत काही बाहेरील सुद्धा मंडळी आहेत. ज्यामध्ये तृप्ती देसाई, शिवलीला आणि इतर.

See also  फोटोतील या बालकलाकाराला ओळखलं का? आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री आणि नवरा निर्माता, नाव जाणून थक्क व्हाल!

आता शिवलीला तर बिग बॉस मराठी मध्ये जशी जाणार हे कळलं आणि जेव्हा पासून ती शो मध्ये दिसायला लागली तेव्हापासून तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग ला सामोरं जावं लागलं. कारण ती एक प्रसिद्ध कीर्तन कार आहे. आणि म्हणून तिने आजाराचं कारण देत शो मधूनच अचानक exit घेतली. प्रत्येक आठवड्यात एक स्पर्धेक या शो मधून बाहेर जात आहे. आणि त्यामुळे हळू हळु शो सुद्धा चर्चेत येत आहे.

आता एक खूप महत्त्वाची विजेती समजली जाणारी दावेदार असलेली स्पर्धक बाहेर जाणार आहे. आणि ती म्हणजे तृप्ती देसाई. होय भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा व महिला सामाजिक कार्यकर्ते. ज्या याआधी नेहमी कोणत्या ना कोणत्या महिलेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र भर आंदोलन करत चर्चेत यायच्या.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओकचे संतप्त विधान म्हणाला, "म्हणून आपल्याला भीक मागायला लागते..."

त्या घर सोडून जाणार म्हंटल्यावर अनेकांना अश्रू अनावर झाले. कारण सगळी एकत्र राहणारी मंडळी आहेत. जरी जिंकण्यासाठी सगळे लढत असली तरी बाहेरून नाते संबंध यांचे खूप चांगले असतात. पडद्यावर तसे दाखवले जात नाही पण पडद्याआड असतातच.

बरं जरी तृप्ती देसाई ही बिग बॉस मराठी मधून बाहेर पडत असली तरी लवकरच मी राजकारण मध्ये प्रवेश करणार आहे अशी मोठी घोषणा सुद्धा तिच्याकडून करण्यात आलेली आहे. आणि यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. की नेमकी कोणत्या पक्षाच्या एन्ट्री की स्वतःचा नवीन पक्ष. तर अश्या चर्चेला कायम उधाण येत असतं.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment