बिग बॉस मध्ये मिळालेलं मानधन हे तृप्ती देसाई वापरणार या कामांसाठी ! जाणून थक्क व्हाल!
बिग बॉस मराठी हा शो सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे. कारण त्यामध्ये प्रत्येक दिवसाच्या भागात होणाऱ्या नवनवीन गोष्टी व आठवड्याच्या शेवटाला कुणी न कुणी बाहेर पडतंय त्यामुळे हळूहळू स्पर्धा सुद्धा खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. महाराष्ट्र मध्ये नावाजलेल्या सर्व निवडक कलाकारांचा, राजकीय, कीर्तनकार यांचा समावेश आहे. शिवलीला आणि तृप्ती देसाई या वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत. ज्यामध्ये पहिल्या दिवसांपासून या दोघी खूप चर्चेत होत्या.
शिवलीला ही आजाराच्या कारणांमुळे बाहेर गेली, लवकरच. पण तृप्ती देसाई यांनी 50 दिवस काढले. या 50 दिवसांत तृप्ती देसाईंची महाराष्ट्राला नव्याने ओळख झाली. कारण आजवर आंदोलन करणारी, किंवा भडकणारी अशी तृप्ती देसाई आपण पाहत आलेलो आहोत.
पण या 50 दिवसांत बिग बॉस मराठी मध्ये आपल्याला तृत्पी देसाईंची नवीन बाजू समोर आली आहे. जी मायेची आहे. प्रेमाची आहे. आईची आहे, तसेच मोठी बहीण म्हणून निभावलेल्या जबाबदारी मुळे तृप्ती देसाई या अश्या असू शकतात. हे त्यांच्या चाहत्यांच्या समोर आलेलं आहे.
बरं, त्याच तृप्ती देसाई यांनी सध्या एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे बिग बॉस मराठी मध्ये 50 दिवसांचं जे काही मानधन मिळालेलं आहे. ते मानधन ती सामाजिक कार्यात वापरणार असल्याचं वृत्त समोर आलेलं आहे.
तसेच येत्या काही काळात नवं आंदोलन सुद्धा केलं जाणार आहे. ज्या आंदोलनाचं नाव आहे, बलात्कारमुक्त महाराष्ट्र. आणि या आंदोलनाचं नेतृत्व तृप्ती देसाई ही करणार आहे. ययाचसोबत कोणत्या तरी राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याची सुद्धा बातमी येत आहे. आता हे कितपत खरं आणि खोटं आहे लवकरच समोर येईल.