“तू सौभाग्यवती हो” मालिकेतील ‘ऐश्वर्या’ आहे प्रसिद्ध अभिनेत्याची लहान बहीण, नाव ऐकून थक्क व्हाल!
झी मराठी वाहिनीवरील मालिका म्हणजे मनोरंजनाचा निखळ खजिना. यासाठी तर संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे या घरगुती मालिकांचा आनंद घेतात. नुकतीच “तू सौभाग्यवती हो” ही मालिका सुरू झाली आहे. यामधील ऐश्वर्या ही आपल्या सालस स्वभावाने व मनमोहक बोलण्याने सर्वांच्या घराघरांत पोहोचली आहे. आपल्या हसतमुख व गोंडस चेहऱ्याने तिने सर्वांनाच वेङ लावले आहे.
अहो, पण ही ऐश्वर्या नेमकी आहे तरी कोण….जिने या मालिकेतून प्रत्येक व्यक्तीला आकर्षित केले आहे. तर ही आहे अभिनेत्री दिक्षा केतकर. निरागस चेहऱ्याची दिक्षा या मालिकेमुळे सध्या चर्चेत आहे. अतिशय लहानशा वयातच तीन मुलांचा बाप असणाऱ्या एका व्यक्तीसोबत तिचे कसं काय लग्न ठरतं… त्यानंतर जाधव कुटुंबाची सून म्हणून ती शोभून दिसते का? हे सर्व आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
तुम्हांला ठाऊक आहे का, ऐश्वर्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिक्षा ही आपल्या रियल लाइफ मध्ये खूपच कमालीची बोल्ड दिसते. तिचे ग्लॅमरस फोटोज् पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल की ही ऐश्वर्याच आहे का, असा विचार तुम्ही देखील कराल.
परंतु अभिनेत्री दिक्षा ची आणखी एक ओळख आहे. कारण तुमचा- आमचा लाडका अभिनेता शशांक केतकर याची ही क्यूट बहीण आहे. “होणार सून मी या घरची” या लोकप्रिय मालिकेतून तो मराठी रसिकांमध्ये प्रसिद्ध झाला.
अभिनेत्री दिक्षा हिची “तू सौभाग्यवती हो” ही पहिलीच मालिका आहे. आपल्या पहिल्या मालिकेतील अभिनयानेच तिने चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे. दिक्षासोबत या मालिकेत हरिश दुधाङे, ज्योती चांदेकर, रोहित फाळके, गुरू दिवेकर आणि प्रिया करमरकर हे कलाकार देखील आहेत.
अभिनेत्री दिक्षा केतकर हिने बालकलाकार म्हणून अनेक नाटकांत काम केले आहे. या भूमिकांसाठी तिला पुरस्कार देखील मिळाले आहेत. तसेच न्यूयॉर्क मध्ये जाऊन तिने अभिनयाचे व्यवस्थित प्रशिक्षण सुद्धा घेतले आहे. इतकंच नव्हे तर “धूसर” या मराठी चित्रपटात तिने उत्तम काम देखील केले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.