का बरं घेतला, छोट्याशा परीने “माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेतून ब्रेक, यामागील कारण आहे खूपच भावनिक
झी मराठी वाहिनीवर सध्या “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेने अक्षरशः धूमशान माजवलं आहे. अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे हे या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या मालिकेत संकर्षण कऱ्हाडे आणि बालकलाकार छोटीशी, क्यूट अशी मायरा यांनी या मालिकेला चार चाँद लावले. या सर्व मोठमोठ्या कलाकारांमध्ये ही छोटीशी मायरा चांगलीच मिसळून गेली. त्यामुळेच खूप कमी कालावधीतच ही क्यूट परी महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांत पोहोचली. परंतु नुकतेच परीने या मालिकेतून ब्रेक घेतला असल्याचे म्हटले जात आहे.
अरे बापरे ! असं का बरं घडलं असावं? हा प्रश्न तुमच्याही मनात निर्माण झालाच असेल की… सोशल मीडियावरील मराठी सिरीयल टीआरपी पेज यांच्या अधिकृत ही पोस्ट शेयर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये काही कालावधीसाठी परीने म्हणजेच मायराने मालिकेतून ब्रेक घेतला आहे, असे म्हटले जात आहे.
मीडियाच्या माहितीनुसार नुकताच परीने आपला 5 वा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे या बर्थडे सेलिब्रेशनसाठी तिने छोटासा ब्रेक घेतला आहे. मात्र हा ब्रेक संपल्यावर आपली मायरा पुन्हा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येणार आहे हे नक्की….. त्यामुळे काही काळासाठी जरी मायराने माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून ब्रेक घेतला असला, तरीही तिने आपल्या काही भागांचे शूटिंग मात्र आधीच करून ठेवले आहे. म्हणून दररोज आपल्या परीला मालिकेमध्ये पाहायला विसरू नका बरं…
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.