‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारचं झालं लग्न? लग्नाचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल!

‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. साधी, सोज्वळ ईशा अरूण निमकर आणि सरंजामे कंपनीचे प्रमुख विक्रांत सरंजामे यांच्या प्रेमकथेने रसिकांना भुरळ पाडली होती. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीदेखील या मालिकेतील कलाकारांनी रसिकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.

नुकताच गायत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती एका वधूच्या लूकमध्ये दिसत आहे. ‘तुला पाहते रे’ या मालिकेत ईशाच्या भूमिकेत असलेली गायत्री दातार सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावरून नेहमीच अपडेट देत असते. नुकताच तिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमुळे एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये ती वधूच्या लूकमध्ये दिसत आहे. त्यामुळे गायत्री लग्न करत आहे का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. खुद्द गायत्रीने वधू रूपातील काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये ती एखाद्या नवरी प्रमाणे अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

या फोटोमध्ये ती एखाद्या नवरी प्रमाणे अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. पण तिचा हा लूक पाहता ती लग्न बंधानात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच ती कोणाशी लग्न करते? तिचा लग्नसोहळा कुठे पार पडणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

गायत्रीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये गायत्री नववधूच्या रूपात दिसत असून तिने लग्न केले का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेला आहे. पण गायत्रीने लग्न केलेले नसून हा लूक तिचा एका जाहिरातीतील आहे. तेजाज्ञा या ब्रँडसाठी गायत्रीने फोटोशूट केले असून यातील काही फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर शेअर केले आहेत.

‘तुला पाहते रे’ मालिकेतील ईशा निमकर या भूमिकेने चाहत्यांच्या मनात घर केले होते. अभिनेता सुबोध भावेसोबत गायत्रीने साकारलेली ईशाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तर दुसरीकडे सध्या व्हायरल होत असलेले तिचे फोटो तिच्या लग्नातील नाहीत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment