यंदा अश्या प्रकारे साजरे करा तुळशीचे लग्न, जाणून घ्या शुभ मुहूर्त, आख्यायिका, शास्त्रीय महत्व, विवाह विधी…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

भगवान श्रीविष्णूला तुळस ही अतिशय प्रिय आहे. तुळशीचे पान वाहिल्याने श्रीविष्णू जितके प्रसन्न होतात, तितके अन्य कशानेही होत नाहीत. तुळशीवर वाहिलेले जल मस्तकी धारण केल्यास साक्षात गंगास्नानाचे पुण्य लाभते. आणि ज्या घरात तुळशीचा विवाह होतो, त्या घरातील उपवर मुलामुलींचा विवाह सुकर होतो, अशी भाविकांची श्रद्धा, आणि समाजमान्यता आहे.  भगवान श्रीविष्णूला तुळस अतिप्रिय म्हणून तिला ‘हरिप्रिया’ असेही म्हणतात. पुढे वृंदा हिनेही द्वापार युगात रुक्मिणीच्या रूपाने अवतार घेऊन विष्णूचा अवतार श्रीकृष्ण त्यास कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी वरले. अशा प्रकारे, हिंदू लोक रुक्मिणी-कृष्णविवाह तुळशी विवाह विधीच्या रूपाने त्या दिवशी दरवर्षी साजरा करतात.

यंदा दि. २६ नोव्हेंबर २०२० पासून तुळशी विवाह आरंभ होत आहे.

Advertisement

तुळशी विवाहाची आख्यायिका : जालंदर असुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती. तिच्या पुण्यप्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता. वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंदरचा पराभव शक्य नाही, हे देवतांना कळून चुकले. म्हणून भगवान महाविष्णूंनी जालंदराच्या अनुपस्थितीत त्याचेच रूप धारण करून, त्याच्या महाली जाऊन वृंदेचे सत्व हरण केले. सती वृंदा हिच पुढे तुळशीरूपाने प्रगट झाली, तेव्हा तिचे महात्म्य वाढवण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वत: तिच्याशी लग्न केले. त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात.

See also  प्रत्येक पत्नी आपल्या पती पासून लपून ठेवते या गोष्टी, ही गोष्ट तर कधीच सांगत नाही, ऐकून थक्क व्हाल...

तुळशीचे धार्मिक व शास्त्रीय महत्त्व : तुळस ही बहुगुणी व प्रभावी औषध आहे. त्यामुळे शास्त्राने देवपूजा व श्राद्ध यामध्ये तुळस आवश्यक सांगितली आहे. एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणे, हे धार्मिकतेचे व सदाचाराचे प्रतीक मानले जाते. अनेक व्याधींवर तुळस हे प्रभावी औषध आहे. श्रीविष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीचे पान वाहिल्याने श्रीविष्णू जितके प्रसन्न होतात, ते अन्य कशानेही होत नाहीत.

Advertisement

तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगास्नानाचे पुण्य लाभते. तुळशी पूजेशिवाय नित्य पूजा पूर्ण होत नाही. अंत्यकाळी अंगावर तुळशीपत्र असणारा मनुष्य वैकुंठास जातो, अशी श्रद्धा आहे. म्हणून मृतकाच्या मुखात गंगाजळाप्रमाणे तुलसीपत्रही ठेवण्यात येते. तुळशी दुषित वायू शोषून घेत प्राणवायू सोडते, हे शास्त्रानेही केंव्हाच सिद्ध झाले आहे. म्हणून घरोघरी दारासमोर तुळशी वृंदावन बांधले जाते. तसेच शहरी भागातही खिडकीतल्या कुंडीत तुळशीचे रोप लावले जाते. दारात तुळशी असणे, हे शुभलक्षण मानले जाते.

See also  देशातील पहिल्या 'महिला बाउन्सर' ग्रुपची सर्वेसर्वा आहे ही महाराष्ट्रातील रणरागिणी, त्यांचा खडतर प्रवास वाचून थक्क व्हाल!

तुळशी विवाह विधी : कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुलसी विवाह करण्याचीप्रथा असली, तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह करतात. काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावून ते वाढवतात व वरील दिवशी तिचे लग्न लावतात.

Advertisement

विवाहदिनी तुळशीवृंदावन स्वच्छ व सुशोभित करतात. त्यापुढे रांगोळी काढून बाळकृष्ण व तुळशी यांची एकत्र षोडशोपचार पूजा करतात. फराळ, मिठाईचा नैवेद्य दाखवतात. सनई-चौघडे वाजवतात.आजकाल सीडी किंवा अगदी मोबाईल वरही मंगलधून लावतात. फटाके फोडतात. उपस्थितांना अक्षता वाटून रितसर लग्नविधी करून गुरुजी मंगलाष्टक म्हणतात. अशा थाटात विवाह लावला जातो. सर्वांना प्रसाद, फराळ किंवा खाऊ वाटप केला जातो. ज्या घरात तुळशीचा विवाह होतो, त्या घरातील उपवर मुलामुलींचा विवाह लवकर, यथासांग आणि विधिवत होतो, अशी भाविकांची श्रद्धा असते.

See also  A अक्षरापासून सुरू होणाऱ्या व्यक्तींचे भविष्य असते काही असे, जाणून घ्या कसा असतो त्यांचा स्वभाव व करियर...

तुळशीची आरती :

Advertisement

जय देव जय देवी जय माये तुळशी ।
निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी।

ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी ।
अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं
सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी।

शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी ।
मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ।
सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।

अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।
गोसावीसुत विनवी मजला तूं तारी।

टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !

Leave a Comment

close