ट्विटरने मोदी सरकारच्या ‘या’ नवीन मंत्र्याचे ब्ल्यु टीक बॅज हटवले

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

नवी दिल्ली: मागील काही काळापासून मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विट्टर आणि केंद्र सरकारमध्ये नवीन आयटी नियमांच्या अंमलबाजवणीबाबत वाद सुरू आहे. माजी आयटी मंत्री रविशंकर प्रसाद आणि ट्विटरमध्ये बराच काळ वाद चालला. यातच आता ट्विटरने मोदी सरकारमधील नवीन मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या अधिकृत ट्विटर खात्याचे ब्ल्यु टीक बॅज हटवले आहे. बॅज का हटवण्यात आले याबाबत अद्याप ट्विटरकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. (Twitter removes blue tick badge of New Minister Rajeev Chandrashekhar)

twitter blue tick

मागील आठवड्यातच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री (Minister of State for Electronics and Information Technology) म्हणून चंद्रशेखर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते.

See also  प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे ही अभिनेत्री करणार करणार 'या' पक्षात प्रवेश, जाणून घ्या कोणता आहे तो पक्ष!

ब्ल्यु टीक बॅज कशासाठी असतो?

ट्विटर तसेच अन्य समाजमाध्यंमावर ब्ल्यु टीक बॅजचे फार महत्व आहे. ट्विटरच्या मते, जे खाते अधिकृत आणि लोकांच्या हितासाठी असते त्यांना ब्ल्यु टीक बॅज देण्यात येतो. जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये. हा बॅज मिळवण्यासाठी तत्सम ट्विटर खाते सक्रिय आणि अधिकृत असावे लागते. हा बॅज देण्यापूर्वी ट्विटर त्या खात्याची सर्व माहिती सत्यापित (Verify) करत असते.

सूत्रांच्या माहिती नुसार, ट्विटर खात्याचे यूजरनेम बदलण्यात आल्यामुळे राजीव चंद्रशेखर यांचे ब्ल्यु टीक बॅज काढण्यात आले असेल असा अंदाज आहे. राजीव चंद्रशेखर यांचे पहिले सत्यापित खाते Rajeev_MP असे होते. पण आता मंत्री झाल्यानंतर त्यांनी आपले यूजरनेम Rajeev_goi केले आहे. तज्ञांच्या मते, कधीकधी नाव बदलल्यास निळ्या रंगाचे टिक आपोआपच काढून टाकले जाते.

See also  केंद्र सरकारच्या ‘या’ उपक्रमांतर्गत मिळेल शेतकर्‍यांना 50 टक्के अनुदान, जाणून घ्या काय आहे योजना

यापूर्वी सुद्धा अनेक नेत्यांचे ब्ल्यु टीक बॅज काढण्यात आले होते

भारतातील एखाद्या मोठ्या नेत्याचे ब्ल्यु टीक बॅज हटवण्यात आल्याची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वी सुद्धा असे अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत. गेल्या महिन्यात ट्विटरने उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर हँडलवरून निळा टिक हटविला होता. त्याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक प्रमुख मोहन भागवत, संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी इत्यादि खाती ट्विटरद्वारे असत्यापित (Unverified) केली गेली. मात्र, नंतर त्यांचे ब्ल्यु टीक बॅज परत देण्यात आले होते.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment