उदयनराजे भोसलेंवर देखील ‘पुष्पा’ च्या प्रेमात, लुंगी परिधान करून काढले त्यांनी कार्यकर्त्यांसोबत सेल्फी

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो हल्ली जिकडे तिकडे आपल्याला “पुष्पा” चे वेङ सर्वांना लागलेले दिसत आहे. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, या ढिंकचाक सिनेमाची क्रेझ ही आता फक्त चाहत्यांमध्ये व सेलिब्रिटींमध्ये दिसून येत नाही. तर राजकारण्यांमध्ये सुद्धा दिसून येत आहे. त्यावरूनच पुष्पा सिनेमा कितपत हिट झाला, याचा आपण अंदाज लावू शकतो. बॉक्सऑफिसवर धम्माल केल्यावर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहणाऱ्यांची संख्या देखील प्रचंड प्रमाणात आहे.

इन्स्टाग्रामपासून ते अनेक सोशल मीडिया साइट्सवर या सिनेमातील गाणी, ङायलॉग हे लोकांमध्ये तुफान गाजवत आहे. याचेच एक ताजेतवाने उदाहरण म्हणजे उदयनराजे भोसले. आपल्याला तर माहीतच आहे की, उदयनराजे भोसले हे आपल्या हटके ङायलॉगबाजीमुळे आणि अनोख्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. रविवारी सातारा येथील पवई नाक्यावर “राजधानी सेल्फी पॉईंट” वर ते चक्क लुंगी परिधान करून गेले होते.

See also  हे प्रसिद्ध युट्यूब स्टार लवकरच झळकणार बॉलीवूड चित्रपटांमध्ये, हि मराठी युट्यूब स्टार तर...

त्या दरम्यान “तुम्ही अचानकपणे लुंगी का बरं नेसली”, असे एका पत्रकाराने त्यांना विचारले असता त्याचे उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, मला खूप छान आणि मोकळं वाटतंय. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यावेळी उदयनराजे भोसले यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा लुंगी नेसली होती. त्यावेळी सेल्फी पॉईंटवर सर्वांनी अगदी मनसोक्तपणे फोटोज् काढले व नंतर उदयनराजे आपल्या गाडीत जाऊन बसले. त्यावेळी योगायोग असा की,उदयनराजेंच्या गाङीत पुष्पा सिनेमातील गाणे सुरू होते. कदाचित हे त्यांच्या फेवरेट गाण्यांपैकी एक असावे. त्यानंतर नेहमीप्रमाणे जनतेला प्लाईंग किस देत व आपली कॉलर उङवत ते स्टाईलमध्ये निघून गेले.

पुष्पा सिनेमाविषयी म्हणायचे झाले तर या सिनेमाचे आतापर्यंत मल्ल्याळम, तमिळ, तेलुगु आणि कन्नड व्हर्जन हे 7 जानेवारीला ॲमेझाॅन ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आलं होतं. त्यानंतर या सिनेमाचे हिंदी व्हर्जन 14 जानेवारीला रिलीज करण्यात आले. सोशल मीडियावर तर सध्या ह्या चित्रपटातील ङायलॉग्ज आणि ङान्सचे प्रचंड रिल्स वायरल करण्यात येत आहे.

See also  आता कोरोनाच्या निशाण्यावर लहान मुलं, ‘या’ ठिकाणी झाला एकाच आठवड्यात 100 पेक्षा जास्त निष्पाप मुलांचा मृत्यू

बॉक्सऑफिसवर पुष्पा च्या हिंदी व्हर्जनने आतापर्यंत तब्बल 80 कोटींहून अधिक कमाई केली आहे. सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचे वातावरण वाढत असल्याने चित्रपटगृहात जाऊन पुष्पा सिनेमा पाहणे लोक टाळत आहे. तरीदेखील त्या सिनेमाची वाढती क्रेझ आपल्याला चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. थोडक्यात म्हणजे पुष्पा हा 2021 मधील सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला असे म्हणण्यास हरकत नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  'या' कारणांमुळे प्रकाश आंबेडकर पुढील 3 महीने सक्रिय राजकारणापासून राहणार दूर
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment