‘या’ दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता, महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना मिळू शकते मंत्रिमंडळात स्थान

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बातमी येत आहे. मात्र, नेमकं कधी याचा काही खुलासा झाला नव्हता. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार 7 जुलै रोजी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

काहींना डच्चू तर काही नवीन चेहर्‍यांचा समावेश होण्याची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कार्याची समीक्षा करण्यात येत असून, असमाधानकारक काम करणार्‍या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तसेच चांगली कामगिरी करणार्‍या खासदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते 20 नवीन चेहर्‍यांना संधी मिळू शकते.

महाराष्ट्रातील या नेत्यांना मिळेल संधी

केंद्रीयमंत्रीपद मिळवण्यासाठी अनेक नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्या नावाची सर्वात जास्त चर्चा होत आहे. त्यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावून घेतले आहे. जे.पी. नड्डा यांच्या कार्यालयातून फोन आल्यानंतर ते दिल्लीत दाखल झाले आहेत.

See also  सारा अली खान व जान्हवी कपूरने घेतले केदारनाथचे दर्शन, सोशल मीडियावर फोटो होत आहेत व्हायरल...

नारायण राणेंसोबतच महाराष्ट्रातील आणखी एका नावाची चर्चा होत आहे. 2014 मध्ये भाजप पक्षात प्रवेश केलेले भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांनी आपल्या कार्याची छाप सोडली आहे. 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी मोठा विजय मिळवत भिवंडीचे खासदार झाले आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय कामावर पकड असल्याने भाजपपक्षात त्यांनी स्वतःची चांगली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

देशभरातील हे नेते मंत्रीपदाच्या शर्यतीत

2019 मध्ये दुसर्‍यांदा निवडून आल्यापासून नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला नव्हता. उद्या 7 जुलै रोजी विस्तार होणार आहे. यासाठी देशातील मोठ्या नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यामध्ये आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे आणि हिना गावित यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच भाजपाच्या मित्रपक्षांच्या काही नेत्यांनाही संधी मिळू शकते.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment