“या” मोठ्या घटनेने क्षणार्धात तु’टले होते लता मंगेशकरांनी वर्षानुवर्षे उराशी जपलेले स्वप्नं, लतादीदींचा हा अज्ञात किस्सा…
भारतरत्न लता मंगेशकर… स्वर्गात जणू ब्रह्मदेवाने सरस्वतीच्या चरणांवर वाहिलेले आणि तिथून घरंगळुन मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या पदरी पडलेले हे अनमोल रत्न. लतादीदींच्या आयुष्यातील अनेक गोष्टी तुम्हा-आम्हाला ज्ञात आहेत. पण अजूनही लतादीदींच्या आयुष्याशी संबंधित अनेक पैलू अनेकांसाठी अज्ञात आहेत. त्यातलाच एक असलेला दीदींच्या आयुष्यातला हा अविस्मरणीय असा दु’र्दै’वी योगायोग…
लता मंगेशकर या संगीताच्या बाबतीत लहानपणापासूनच अत्यंत सं’वे’द’न’शी’ल आणि समर्पित आहेत. मास्टर दिनानाथांमुळे दीदींच्या र’क्ता’त’च संगीत होते. वयाच्या १५ व्या वर्षापासूनच त्यांचे संगीतावरील प्रेम वाढू लागले. लताच्या घरी रेडिओ नव्हता.
त्यामुळे त्यांच्या शेजारच्यांच्या रेडिओवर ती नेहमीच के. एल. सैगलची तसेच अन्य लोकप्रिय गाणी, भजने इत्यादी ऐकत असे. आणि ते ऐकतांनाच लता ती गाणी गाण्याचाही प्रयत्न करायची.
पुढील काही वर्षे लता रेडिओवरील गाणी ऐकण्यासाठी, इतरांच्याच घरातील रेडिओवर अवलंबून होती. पुढे वयाच्या १८ व्या वर्षी असा एक काळ आला जेव्हा लताजींना स्वत:चा रेडिओ विकत घ्यावा, असे वाटले. या मागचे मुख्य कारण म्हणजे, इतरांच्या रेडिओवर आपण किती काळ अवलंबून राहणार? ही भावना, आणि जर आपला स्वतःचा रेडिओ असेल तर त्यावर आपल्या मर्जीनुसार जास्तीत जास्त काळ गाणी, कव्वाली आणि भजन इ. ऐकून जास्तीत जास्त संगीत शिकणे.
झाssले… लताजींनी मग स्वतःचा रेडिओ खरेदी करण्याचा संकल्प केला. पण जवळ पुरेसे पैसे नसल्यामुळे त्यांना दरवेळी हा संकल्प पुढेच ढकलावा लागे. लताजींनी आता रेडिओसाठी थोडेथोडे पैसे जमा करण्यास सुरवात केली.
असे करत करत, शेवटी लताजींनी पुरेसे पैसे गोळा केले. शेवटी त्यांच्या जीवनात एकदाचा तो क्षण आला. अनेक वर्षे वाचविलेले ते पैसे, स्वतःचा रेडिओ खरेदी करून त्यावर गाणी ऐकणे हे अनेक वर्षे उराशी बाळगलेले स्वप्नं पूर्ण होण्याचा तो दिवस. लताजींच्या आनंदाला पारावार नव्हता.
त्या दिवशी लताजी सकाळपासूनच रेडिओ खरेदीच्या उत्सुकतेने, आनंदी मनाने बाजारात जाण्यासाठी तयार झाल्या होत्या. हातात अनेक वर्षे साठवलेला पैसा आणि डोळ्यांत वर्षानुवर्षे जपलेले स्वप्न, लताजींना एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जात होते. अखेरीस, त्या दुकानात गेल्या. दुकानदाराकडून रेडिओ तपासून व त्याचे सर्व ऑपरेटिंग समजून घेतल्यानंतर लताजी स्वप्नपूर्तीच्या आनंदासह रेडिओ घेऊन घरी आल्या. पण कदाचित… लताजींचा हा आनंद फक्त एका क्षणापुरताच ठरला, कारण…
आपली आवडती गाणी ऐकण्यासाठी लताजींनी रेडिओ चालू करताक्षणीच… प्रथम एक बातमी सांगितली गेली, आणि त्या बातमीमुळे क्षणार्धातच लताजींचा आनंद त्यांच्यापासून हिरावला गेला. लताजींचे आणि तमाम भारतीयांचे लाडके असे दिग्गज गायक आणि संगीतकार के. एल. सैगल यांच्या नि’ध’ना’ची ती बातमी होती.
ही बातमी ऐकून लताजींना ध’क्का’च बसला. दुःखाने त्यांचे त्याचे मन व्या’कु’ळ झाले. डोळे पाण्याने ड’ब’ड’ब’ले. इतक्या कष्टाने आणि हौसेने खरेदी केलेला रेडिओ ज्यांची गाणी ऐकण्यासाठी खरेदी केला त्याच आवडत्या दिग्गज गायक, संगीतकाराच्या मृ’त्यू’ची बातमी त्यांना सांगून गेला.
लताजी इतक्या बे’चै’न झाल्या की त्यांनी हा रेडिओच घरात न ठेवण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्याच दिवशी त्या रेडिओ दुकानदाराकडे जाऊन तो परत केला. इतकेच नव्हे, तर त्यांच्या मनांत ही स’ल इतकी सलत होती की त्यांनी पुढे कित्येक दिवस रेडिओ साधा ऐकला सुद्धा नाही. तर अशा या लतादीदी आणि असे त्यांचे संगीतप्रेम. असोss…
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.