“दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे” या चित्रपटाविषयी त्या 21 गोष्टी ज्या जगाला माहित नाहीत, ऐकून विश्वासच बसणार नाही…

१९९५ मध्ये आलेला दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट. यशराज फिल्म्सच्या स्थापनेचे ते २५ वे वर्ष होते. यश चोप्रा यांचा मोठा मुलगा आदित्य चोप्रा यांचे दिग्दर्शनात पदार्पण. प्रेमाची संस्कृती बदलुन चित्रपट इतिहासात अजरामर झालेली ही कलाकृती. चला तर मग जाणून घेऊयात, कोणत्या आहेत या मनोरंजक गोष्टी.

झुरिचमध्ये नशेत असताना ‘जरा सा झूम लू मैं’ हे गाणे गायल्यानंतर जेव्हा सिमरन सकाळी उठते, तेव्हा शाहरुख म्हणजे राज तिला म्हणतो की रात्री त्यांच्यात सर्व काही घडले आणि आता ते कोणालाही तोंड दाखवू शकणार नाहीत. या प्रसिद्ध सीनमध्ये शाहरुखच्या छातीवर ओठांच्या खुणा आहेत. काजोलने खरेच स्वत: लिपस्टिकच्या ओठांनी त्या खुणा उमटविल्या होत्या.

शाहरुखने चित्रपटात ब्लॅक लेदर जॅकेट परिधान केले होते जे तरुणांमध्ये फॅशन बनले. हे जॅकेट उदय चोप्रा यांनी कॅलिफोर्नियामधील हार्ले-डेव्हिडसन येथील दुकानातून 400 $ मध्ये खरेदी केले. नंतर शाहरुखने ते स्वतःलाच ठेऊन घेतले.

सप्टेंबर १९९५ मध्ये आमिर खानचा चित्रपट ‘रंगीला’ प्रदर्शित झाला आणि ऑक्टोबरमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’. पुढील वर्षी फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये दोन्ही चित्रपट एकाच वेळी प्रमुख वर्गात नामांकित झाले. खासकरुन सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या प्रकारात शाहरुख-आमिर समोरासमोर होते. खास गोष्ट अशी की बॉलीवूड अवॉर्ड्समध्ये कधीही न गेलेला आमिरही त्यात आला होता. आपणच जिंकू याची आमिरला खात्री होती पण शाहरुखला हा पुरस्कार मिळाला. शाहरुख फिल्मफेअर च्या अगदी जवळच्या वर्तुळात आहे. हाच तो दिवस ज्या दिवसापासून आमिरने चित्रपट पुरस्कार सोहळ्यात जाणे बंद केले.

आपल्या कारकीर्दीत शाहरुख खानने राज या नावाने सर्वाधिक काम केले असून हे नाव अनिवासी भारतीय प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. शाहरुख केवळ डीडीएलजेमधून या नावाने लोकप्रिय झाला. हे नाव रणबीर कपूरचे आजोबा आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते राज कपूर यांच्या नावावरुन ठेवले गेले. दिग्दर्शक आदित्य हा राज कपूरचा मोठा चाहता आहे.

या चित्रपटात ‘मेहंदी लगा के रखना’ हे गाणेच नव्हते. यश चोप्रा यांनी हे गाणे दुसऱ्याच चित्रपटासाठी बनविले होते, पण नंतर यात टाकले. या गाण्यात काजोलची सिमरन हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली आहे. हे रंग मनीष मल्होत्राने निवडले होते. आदित्य चोप्रा हे या विरूद्ध होते कारण पंजाबी नववधू लाल किंवा गुलाबी रंगाचे ड्रेस घालतात. तसे, स्वतःच्या लग्नात काजोलने हिरवी महाराष्ट्रीय साडी नेसली होती.

प्रथम नायकाची भूमिका हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझसाठी लिहिलेली होती. दिग्दर्शक आदिंच्या कथेत भारतीय मुलगी अमेरिकन हिरोच्या प्रेमात पडते. पण नंतर यश चोप्राच्या सूचनेनुसार आदिंनी इंडियन हीरो घेतला. किरण खेर यांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटाचे नाव सुचवले होते. क्रेडिट्समध्ये त्यांना त्याचे श्रेयही देण्यात आले आहे.

आदि आणि यशजी यांना चित्रपटात ऍक्शन सीन घ्यायचेच नव्हते. शाहरुखने आग्रहाने त्यांना या चित्रपटात ऍक्शन सीन ठेवण्यास सांगितले. शाहरुख आजही म्हणतो की डीडीएलजे हिट झाला, कारण क्लायमॅक्स मधे ऍक्शन सीन होते.

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा भारतातील पहिला चित्रपट होता, ज्याची मेकिंगची अर्धा-तासांचा माहितीपट टीव्हीवर दर्शविला होता. हा माहितीपट करण जोहर आणि उदय चोप्रा यांनी एकत्र संपादित केला होता.

‘तुझे देखा तो ये जान सनम’ या चित्रपटाच्या गाण्याचे काही भाग हरियाणामधील एका गावात चित्रीत करण्यात आले. शूटिंगसाठी पंचायतींकडून मान्यता घेण्यात आली होती पण शेवटच्या क्षणी तेथील लोक बिघडले. शाहरुख मध्ये आला आणि त्याने अस्सल हरियाणवी भाषा बोलून प्रेमाने हे प्रकरण शांत केले.

अनुपम खेरने राजच्या कूल डॅडची भूमिका केली पण प्रत्यक्षात त्यांना अमरीश पुरीची भूमिका करायची होती. त्यांनी आदिंना सांगितले अमरीश पुरीची सिमरनच्या वडिलांची मोठी भूमिका मला पाहिजे, पण आदिने त्यांना ती भूमिका दिली नाही आणि शेवटी अनुपम खेरला धर्मवीर मल्होत्रा ​​करावा लागला. राजची भूमिका पहिल्यांदा सैफ अली खानला देण्यात आली होती. पण त्याने नकार दिला. सलमान खान आणि आमिर खान यांनाही ही भूमिका ऑफर करण्यात आली होती.

शेवटी शाहरुखला पटकथा सांगितली पण त्यानेही नकार दिला. त्याला एखादी रोमँटिक भूमिका करायची नव्हती. कारण तो नकारात्मक भूमिकेत यशस्वी ठरत होता. पण नंतर यश चोप्रा म्हणाले की, जर तू एखादा रोमँटिक चित्रपट केला नाहीस तर तू कधीही मोठा स्टार होणार नाहीस. यानंतर शाहरुखने हा चित्रपट साइन केला.

रेल्वे स्टेशनवरील शेवटच्या सीनमध्ये घरातील मुख्य माणसे हजर असतात, पण हिमानी शिवपुरीचे कम्मोचे पात्र हजर नाही. स्क्रिप्टनुसार ती या सीनमध्ये होती पण त्यावेळीच नेमका तिच्या पतीचे निधन झाले होते.

‘मेरे ख्वाबों में जो आए’ या चित्रपटात काजोलच्या एन्ट्रीचे गाणे आहे. यात ती टॉवेल्समध्ये नाचताना दिसत आहे. सुरुवातीला तिचा तीव्र विरोध होता. ती आदिशी भांडली सुद्धा की मुलगी इतक्या वेळ टॉवेलमध्ये नाच का करेल? आणि ती काही शॉर्ट कपड्यांमध्ये नाचणारी नायिका नाहीय. नंतर आदिने समजावले की हे गाणे यादगार होईल. मग काजोल कशीबशी तयार झाली.

या गाण्याच्या शेवटच्या भागात काजोल पांढऱ्या रंगाचा शॉर्ट टॉप आणि शॉर्ट स्कर्ट परिधान करुन पावसात नाचली. ओरिजनली हा स्कर्ट खूप लांब होता पण आदिंच्या सांगण्यावरून डिझायनर मनीष मल्होत्राने तो कापला. अखेरीस तो खूपच लहान केला, मगच गाण्याचे चित्रीकरणही झाले.

या कथेत परमीत सेठीने सिमरनचा नवरा कुलजीत याची भूमिका केली होती. त्याची स्क्रीन टेस्ट अरमान कोहलीने सुद्धा दिली होती पण भूमिका परमीतला मिळाली कारण तो टेस्टसाठी नियमानुसार संपूर्ण गेटअप मधे आला होता.

राजच्या कूल डॅडची भूमिका प्रत्यक्षात यश चोप्राच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित होती. आदिंनी धरमवीर मल्होत्राची भूमिका वडिलांचे वागणे व व्यक्तिमत्त्व बघून लिहिली. यश चोप्राची पत्नी पामेलाच्या मते, यशजी हे मुलांचा पिता नव्हे मित्र बनण्यावर विश्वास ठेवतात. विशेष म्हणजे प्रेक्षकांनाही हे खूपच आवडले.

आदित्य चोप्रा आणि करण जोहर यांना अनुपम खेर यांनी जुलै १९९४ मध्ये हम आपके हैं कौनच्या ट्रायल शोमध्ये आमंत्रित केले होते. दोघे गेले. दोघांनाही हा चित्रपट खूपच आवडला. ते खूपच प्रभावित झाले. त्याचवेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बड़जात्या पुढच्या वर्षी रिलीज झालेल्या आदिंच्या ‘डीडीएलजे’ मुळे खूप प्रभावित झाले होते. एक वेळ असा होता की ते आठवड्यातुन एकदातरी हा चित्रपट बघायचेच. ते सांगतात की माझा प्रत्येक नवीन चित्रपट सुरू करण्यापूर्वी मी ‘डीडीएलजे’ नक्कीच पाहतो.

जेव्हा राज अपयशी ठरतो तेव्हा त्याचे वडील (अनुपम खेर) रागावले नाहीत तर आनंदी असतात. ते त्यांच्या पूर्वजांच्या भिंतीवर लटकलेल्या चित्राकडे राजचे लक्ष वेधतात आणि सांगतात की ते त्यांच्या पावलावरुन चालत आहेत. या सीनमध्ये अनुपम खेरने आपल्या खऱ्याखुऱ्या काकांची नावे घेतली होती की जे खरेच अभ्यासात चांगले नव्हते.

फराह खानने ‘रुक जा ओ दिल दीवाने’ हे एकच गाणे कोरिओग्राफ केले. ती इतर गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन करण्यासाठी युरोपला जायला खूप उत्सुक होती पण जाऊ शकली नाही कारण तिच्या त्या काळातील नृत्य दिग्दर्शन तारखा नाना पाटेकर यांनी बुक केलेल्या होत्या.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment