वॅलेंटाईन्स डे निमित्ताने एक खास लेख: प्रेम, जगातली एक सुंदर आणि तितकीच नाजूक भावना..!!

आयुष्यात प्रत्येक जण प्रेमाची ही अनमोल अशी भावना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एकदा तरी अनुभवतोच. पण प्रेमात पडणं आणि प्रेम निभावणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रेमात पडणं फार सोप्पं तर प्रेम निभावणं हे तितकंच क’ठी’ण. कुणावर प्रेम करायचं हे कळण्या अगोदर प्रेम काय असतं हे समजुन घेणे महत्त्वाचे ठरतं.

एक मुलगा आणि एक मुलगी सतत एकमेकांच्या संपर्कात राहत असतील तर त्यांच्यात प्रेमाचे अंकुर फुलण्यास वेळ लागत नाही हे एक जगमान्य सत्य आहे. प्रेमाची एक परीभाषा ओळख देखील आहे. हीच सुरवातीची ओळख मैत्रीत बदलते आणि जास्त जवळीक-संपर्क वाढला तर मैत्रीचे रुपांतर प्रेमात व्हायला वेळ लागत नाही. पण हिच प्रेमाची निवड ठरू शकत नाही. स्थलपरत्वे वा एखाद्याशी तात्पुरत्या प्रभावाखाली प्रेम करणं म्हणजे प्रेमात पडणं. पण इथेच चुक होऊन बसते. त्यामुळे होत्याच नव्हत होण्यास वेळ लागत नाही.

जसा संपर्क वाढतो तशी आपुलक अन काळजी देखील वाढते. मात्र जेव्हा काळजी ही अतिशय जास्त प्रमाणात घेतली जाते तर तिथे अशी ही शक्यता तयार होऊ शकते की त्या दोघांपैकी कुणा एकाला त्या काळजीचा कं’टा’ळा येईल. मग नंतर याच भां’ड’णा’त देखील रुपांतर होऊ शकत.

ब-याचदा प्रेम हे पैसा पाहून केलं जातं, हे तितकेसे खरे नसले तरी खुप ठिकाणी याची प्रचिती आलेली दिसून येते. मैत्री च्या नात्याचं प्रेमात रुपांतर होताना पैसा न पाहता एकमेकांचे विचार पाहावेत, असे माझे प्रामाणिक मत आहे. एखादा मुलगा किंवा मुलगी पैशाने भले ही गरीब असेल मात्र विचारांनी ते नक्कीच श्रीमंत असू शकतील.

आपण प्रेम करीत असलेल्या व्यक्तीचे आचार-विचार, वागणं-बोलणं हे आपण जर आयुष्यभर झेलू शकणार असू वा किंवा आज ज्या सुखसुविधा त्याच्यापाशी आहेत त्या नसल्या तरी अगदी कोणत्याही परिस्थितीत त्याच्यासोबत उभे रहाणार असू तर ते प्रेम खरं आहे असं समजण्यात हरकत नाही. कारण आजकाल व्यक्तीच्या तात्पुरत्या प्रभावाखाली येऊन प्रेम केलं जातं आणि मग लग्नानंतर त्याचं बाहेर असणारं वर्तन व घरातलं व’र्त’न यातला फरक त्या प्रेमी युगुलात वादाचा विषय ठरू लागतो आणि त्याची परिणीती पुढे घ’ट’स्फो’टा’त’ही होऊ शकते.

असे असेल तर तिथे ते नाते टिकवण्यासाठी दोघांचाही समजुतदार पणा कामी येतो. म्हणून या बाजू जाणून घेणंही महत्त्वाचं ठरतं कारण यात प्रश्न दोन आयुष्यांचा असतो. अशा वेळी विश्वासाची कसोटी लागते. विश्वास देखील एखाद नात टिकवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक ठरतो.

प्रेम आणि गाढ मैत्री यातला फरक न समजता प्रेम करणा-यांना पण पुढे जाऊन हाच अनुभव येतो. कदाचीत आधीची चांगली मैत्री प्रेम झाल्यावर सं’पु’ष्टा’त देखील येऊ शकते. याच गोष्टी विरहाला देखील कारणीभूत ठरतात. त्यामुळे जे नातं कंफर्टेबल असेल तेच स्विकारा. प्रत्येक गाढ मैत्रीत प्रेम लपलेलंच असतं असं नाही. त्यामूळे दोघांनीही अगोदर समोरील व्यक्तीचं मन समजून घ्यायला हवं. कारण ज्याने मन जिंकलं त्याने जग जिंकलं. तेव्हा अशा मन जिंकणा-या व्यक्तीला एखाद्याचे प्रेम मिळवणे नक्कीच अशक्यप्राय गोष्ट नाही.

काही मैत्रीची नाती प्रेमाहून सरस असतात. आपला जोडीदार निवडताना इतकी काळजी घेतल्यास आयुष्यभर ख-या प्रेमाचा आनंद घेता येईल यात शंका नाही.

एकमेकांवर जीवापाड प्रेम करा..!!

– प्रा. विशाल पवार
चिंचवड , पुणे.

Leave a Comment