‘ते न्यू’ड फोटोशूट मी यासाठी केलेच नव्हते’ अभिनेत्री वनिता खरातनं सांगितले खरे कारण, ऐकून थक्क व्हाल!

रंगमंचावरील एकांकिकांपासून अभिनय करत स्वत:ला प्रस्थापित करणारी मराठी विनोदी अभिनेत्री वनिता खरात वर्षारंभी केलेल्या तिच्या न्यू’ड फोटोशुटमुळे चर्चेत आली होती. आता हे असं न्यू’ड फोटोशुट करण्यामागचे तुझे खरे कारण काय होते? या फोटोशूट वर आलेल्या प्रतिक्रिया, वानिताचा अभिनय, आवडीनिवडी अशा अनेक गोष्टींबाबत वनिताने महाराष्ट्र टाइम्स च्या फेसबुक लाइव्हमध्ये चाहत्यांशी दिलखुलास संवाद साधला.

1609932987 vanita kharat

वनिता खरात ही विनोदी अभिनेत्री म्हणून खऱ्या अर्थानं लोकप्रिय झाली ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या सोनी लिव्ह चॅनल वरील कार्यक्रमातून. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या वनितानं २०२१ च्या सुरुवातीलाच ‘बॉडी पॉ’झि’टी’व्ही’टी’ या संकल्पनेच्या अंतर्गत न्यू’ड फोटोशूट करुन एक अत्यंत धा’ड’सी पाऊल उचललं आणि मग काय?… लगेचच त्याची साधकबाधक चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली. या निमित्तानं तिने दिलेल्या मुलाखतींमध्ये वनिताने तिची मतं स्पष्टपणे मांडली.

मराठी रंगभूमीवरील एकांकिका ते कबीर सिंग हा हिंदी चित्रपट, हा प्रवास, कॉलेजच्या दिवसांच्या आठवणी, मराठी रंगभूमीवरचं तिचं प्रेम या विषयांवर तिनं रसिकांसमोर तिचे मतप्रदर्शन केले. वनिता म्हणते की, “मला कशाचाही न्यू’न’गं’ड नाहीये. सिनेइंडस्ट्रीत मला काम मिळावं म्हणून मी न्यू’ड फोटोशूट केलेलंच नाही. तर एक सामाजिक संदेश देण्यासाठीच मी ते करायचं ठरवलंय.

See also  ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि गायिका बनली आहे महाराष्ट्रशी क्रश, पहा तिचे मनमोहक फोटो...

731415 vanita kharat

सिनेविश्वातील इतर अनेक अभिनेत्रींप्रमाणे मलाही वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतील. ज्यांना फोटोत फक्त अ’श्ली’ल’ता दिसली किंवा दिसते त्यांच्या त्या मा’न’सि’क’ते’साठीच हे फोटोशूट आहे. कारण अश्लीलता त्यांच्या नजरेत आहे. मला शरीराचा न्यू’न’गं’ड कधीच नव्हता. शाळेतही कधी असं वाटलं नाही. आपल्याला चिडवणाऱ्या व्यक्तीला सकारात्मकतेने उत्तर दिलं की कोणी आपल्याला चिडवतच नाही.

एक कलाकार म्हणून आव्हान स्वीकारणं मला आवडतं. बॉडी पॉ’झि’टि’व्हि’टी’चा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून मी फोटोशूट करण्याचा निर्णय घेतला. अभिजीत पानसे यांनी मला ही संकल्पना सांगताच मी त्यांना होकार दिला. हे फोटोशूट करताना अजिबाच भी’ती वाटली नाही. किंबहुना त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. तसंच माझाच माझ्या शरीराकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. माझ्या फोटोवर अनेकांच्या सकारात्मक-नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रियाही मिळाल्या.”

See also  कोट्यवधी संपत्तीचे मालक असूनही अभिनेते नाना पाटेकर जगतात अत्यंत साधारण आयुष्य, दररोज करतात ते ही कामे...

Vanita Kharat

फोटोशूट केल्यानंतर घरी सांगितलं? हा प्रश्नं विचारल्यावर वनिता म्हणाली की, “घरचे काय म्हणतील ही भी’ती होती. पण त्यांनी पाठिंबा दिला. माझ्या आईची प्रतिक्रिया बघून मला सुखद ध’क्का ब’स’ला. ती म्हणाली की, हा तुझ्या कामाचा भाग आहे आणि तू करशील ते योग्यच करशील. माझ्या भावानेही कौतुक केलं.

घरच्यांचा पाठिंबा असल्यानं आता बाकी जग काय म्हणतंय यानं मला फार फरक पडत नाही. नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात काम करायला आवडेल. चित्रपटातील भूमिका अजरामर होते. पण नाटकाला मिळणाऱ्या लाइव्ह प्रतिसादाची मजाच काही औरच. त्यामुळे माझं नाटकावर जास्त प्रेम आहे. मला अजूनही कॉलेजची प्रत्येक तालीम आठवते. एकांकिका, सेट उचलणं, बॅकस्टेजची कामं, हे सगळंच आठवतं. आताही कोणी विचारलं की एकांकिका करशील का तर लगेच हो म्हणेन.”

See also  आईविषयी असे काही ऐकून खूपच सं'तापली मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान, म्हणाली, "माझ्या आईने..."

eqzh7q6vkaar wg.jpg 328299770

या संदर्भात पुढे बोलतांना ती म्हणाली की, “लठ्ठपणावरच्या विनोदाकडे मी सकारात्मकतेनं बघते. विनोद करणं हा कामाचा भाग आहे. वैयक्तिक आयुष्यात ते कधीच आड येत नाही. जाडं असणं हे व्यं’ग नाही. त्यामुळे कोणाच्या व्यं’गा’व’र आम्ही बोलत नाही. पण वैयक्तिक आयुष्यात लठ्ठपणावरून कोणी कोणाला काही बोलू नये.

प्रेक्षकांनी माझ्या फक्त विनोदी भूमिका बघितल्या आहेत. आता जरा वेगळेपण हवंय. नकारात्मक भूमिका साकारण्याची प्रचंड इच्छा आहे. मालिकांचा फार अनुभव नाही; पण संधी मिळाली तर तिथेही काम करायचंय.”

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close