आश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस, गोवत्स तथा गुरु द्वादशी, जाणून घ्या व्रतकथा, मंत्र, पूजनविधी आणि नियम…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

भारत हा शेतीप्रधान देश आहे. आपल्याकडे पशुधनाचे अनन्यसाधारण महत्व आहे. हिंदू धर्म संस्कृतीत गाईला मातेसमान दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे. गाईप्रति असणाऱ्या कृतज्ञतेतूनच वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. तसेच असे म्हणतात की या दिवशी श्री विष्णूंची आपतत्त्वात्मक तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येते. हे तरंग विष्णुलोकातील कामधेनू अव‍तरित करते. म्हणून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गायीची पूजा केली जाते.

वसुबारस कथा : अशी कथा आहे की समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो. अनेक जन्मांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी व गायीच्या शरीरावर जेवढे केस आहे तेवढे वर्ष स्वर्गात वास व्हावा या कामनांपुरतीसाठी ही पूजा केली जाते. एक म्हातारी होती. तिची एक सून होती. त्यांच्या घरात गुरे होती. गव्हाळी-मुगाळी वासरे होती. एक दिवस सासू शेतावर गेली. तिने जाताना सुनेला सांगितले, की गव्हाळे-मुगाळे शिजवून ठेव. तिला सांगायचे होते, की गहू-मूग शिजवून ठेव. पण सुनेने भलताच अर्थ घेतला आणि गोठ्यातील गव्हाळी-मुगाळी वासरे मारून त्यांचे मांस शिजवले. म्हातारी घरी आल्यावर सुनेने पाने मांडली. पानातील मांस बघून म्हातारी घाबरून गेली. तेव्हा सुनेने घडलेला सारा प्रकार तिला सांगितला. त्यामुळे सासू देवापुढे धरणे धरून बसली आणि देवाला विनवू लागली. ‘देवा देवा! कोपू नको. सून अजाण आहे. तिचा अपराध पोटात घाल. माझी वासरे जिवंत कर.’ देवाने त्या म्हातारीचा निर्धार पाहिला आणि सायंकाळी गाई रानातून परत येण्यापूर्वी वासरे जिवंत केली. म्हातारीने मग गाई-वासरांची पूजा केली. त्यांना गोडधोडाचा नैवेद्य दाखवून मग ती जेवली.

See also  महाकाल मंदिराच्या खोदकामाच्या वेळी झाला हा चमत्कार, मिळाले विशाल शिवलिंग आणि भगवान विष्णूंची मूर्ती...

वसुबारस मंत्र : आश्विन कृष्ण द्वादशी या दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात व पुढील मंत्राने तिची प्रार्थना करतात –

तत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते |
मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि ||
अर्थ – हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.

वसुबारस पूजन विधी:

 • या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते.
 • ह्या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू ह्यांची पूजा केली जाते.
 • गायीच्या पायावर पाणी टाकावे.
 • गायीला हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ घालावी.
 • वासराचीही वरीलप्रमाणे पूजा करावी.
 • निरांजनाने ओवाळून घ्यावे.
 • गायीच्या अंगाला स्पर्श करावे.
 • गाय- वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा.
 • नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी.
 • जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय- वासराचे चित्र रेखावे व पूजा करावी.
See also  लग्नासाठी मुलाची उंची मुलीपेक्षा जास्त का असावी, त्यामागे आहे हे शास्त्रीय कारण, कारण ऐकून थक्क व्हाल!

वसुबारस नियम:

 • स्त्रिया या दिवशी दिवसभर उपास करतात.
 • ह्या दिवशी गहू, मूग खात नाही.
 • स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपास सोडतात.
 • या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत.
 • या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थही खात नाहीत.
 • सवाष्ण स्त्रिया वसुबारस या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खातात.
 • अनेक ठिकाणी गायीला लक्ष्मीचे रूप देखील मानले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे प्रत्यक्ष गाय न मिळाल्यास या दिवशी अनेक जण मातीची, पितळाची अन्यथा
 • चांदीची गाय बनवुन तीची पुजा करतात.
 • अनेक जण गोशाळांमधे अथवा गोरक्षण संस्थांमधे जाउन गायीची पुजा करतात आणि तिला नैवेद्य भरवितात.

टीप : वरील माहिती ही हिंदू धर्मग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे, उपाय इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.
शुभं भवतु: !

See also  यंदा अश्या प्रकारे साजरे करा तुळशीचे लग्न, जाणून घ्या शुभ मुहूर्त, आख्यायिका, शास्त्रीय महत्व, विवाह विधी...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment