‘साथ दे तु मला’ फेम या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे होणारा नवरा…
सध्या लग्नाचा सिझन चालू आहे. एकीकडे को’रो’ना आणि दुसरीकडे गृहस्था आश्रमात अनेक प्रवेश करत आहे. अश्यात सेलिब्रिटी लोकं आली की मग त्यांच्या चाहत्यांना सेलिब्रेशन करायला पर्वणी ठरते. कारण सेलिब्रिटी लोकं काय काय करतात हे जाणून घेण्याची त्यांना खूप उत्सुकता असते.
तर आपल्या मराठी टेलिव्हिजन मधून एका लोकप्रिय मालिकेतून आपल्या समोर येणारी एक प्रसिद्ध अशी अभिनेत्री लग्नाच्या बंधनात अडकलेली आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की ती नेमकी कोण ? आणि मालिका कोणती तर साथ दे तू मला ही मालिका. आणि अभिनेत्री तर जाणून घ्या खाली सविस्तर.
वेगवेगळ्या मालिकेतून त्याचसोबत महत्वाची मालिका साथ दे तू मला’, ‘सूर राहू दे’ यासारख्या मालिकांमधून छाप पाडणारी लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी हिचा साखरपुडा झाला. वेदांगीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. ती बातमी जी शेअर झाली ती वाऱ्या सारखी पसरली.
तिला सोशल मीडियावर सतत कार्यरत राहायला खूप आवडतं. आपण काय करतो काय नाही हे चाहत्यांना ही कळायला हवं हा तिचा समज. वेदांगीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुडा सोहळ्याचे चार फोटो शेअर केल आहेत. ‘अनंतकाळाची नवी सुरुवात’ असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. गेल्या शुक्रवारी पुण्यात वेदांगीचा साखरपुडा झाला. चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. कारण लग्न म्हणजे नव्या आयुष्यात प्रवेश. जिथून आनंदाने जगण्याची सुरुवात होते. तर तिला अनेक जण शुभेच्छा देत आहेत.
तिने सोशल मीडियावर फोटो सोबत काही लिहिलं होतं. वेदांगीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवलं आहे. तिने ते सांगितले नाही फक्त साखरपुडा उरकला आहे एवढच तिने लिहिले. इन्स्टाग्रामवर वेदांगीने त्याला टॅग न केल्यामुळे चाहतेही त्याचं नाव जाणून घेण्यास उत्सुक आहेत. वेदांगीचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज, हेही स्पष्ट झालेलं नाही. तिने इंस्टा वर त्याला टॅग सुद्धा केलं नाही. कारण टॅग केलं की कळू शकलं असतं की नवरा कोण होणार आहे.
आता तिच्याबद्दल आपण जे काही जाणून घेतलं ती वेदांगी कुलकर्णी ही नेमकं कोण आहे ? काय काय तिने काम केलं आहे ? अशी उत्तरे आपल्याला पडलीच असतील तर चला जाणून घेऊयात.
वेदांगीने अनेक ठिकाणी चांगली कामे केलेली आहेत. झी युवा वाहिनीवरील सूर राहू दे, तर स्टार प्रवाह वाहिनीवरील साथ दे तू मला यासारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. साथ दे तू मला मालिकेत वेदांगीने प्राजक्ताची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. याशिवाय झी मराठीवरील डान्स महाराष्ट्र डान्समध्येही ती सहभागी झाली होती. त्यात ती खूप चर्चेत आली होती. तिची अदा ही इंतरांपेक्षा खूप वेगळी आहे. ती खूप उत्तम काम ही करते. दिसायला ही ती खूप सुंदर आहे.
प्रत्येक अभिनेत्या अभिनेत्री चा पाया कुठून तरी येत किंवा सुरू होत असतो. अभिनेत्री वेदांगी ची सुरुवात झाली नाटकाने. तिने लंडनच्या आजीबाई या नाटकात काम केले होते. नाटक हे जगण्या सोबत लढण्याचे भान देत असत. तिच्या बाबतीत तेच झालं ती प्रामाणिक पणे काम करत पुढे येत राहिली.
सोशल मीडियावर सेलिब्रिटी लोकांनी कनेक्ट राहणं खूप गरजेचं असतं. इन्स्टाग्रामच्या माध्यामातून वेदांगी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. डान्स ही आपली पॅशन, तर अभिनय हा श्वास असल्याचं वेदांगीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवर लिहिलं आहे.
वेदांगीने ‘सूर राहू दे’ आणि ‘साथ दे तू मला’ या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘साथ दे तू मला’ या मालिकेत वेदांगीने प्राजक्ताची भूमिका साकारली होती. या मालिकेतून वेदांगीने सगळ्यांची मने जिंकली. तिचा मोठा चाहता वर्ग तयार आहे. तिला अनेक चाहते फोल्लो करत असतात. तर तिला तिच्या पुढील वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.