विक्की कौशल व कतरिना कैफ यांनी लग्नानंतर केला पहिला ख्रिसमस सेलिब्रेट, पाहा त्यांचे गोड फोटोज्

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुडमधील सर्वांत सुंदर कपल अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांचा नुकताच 9 ङिसेंबरला विवाह संपन्न झाला. लग्नाच्या आधीपासूनच हे कपल खूप चर्चेत असते. हनिमूनहून परतल्यावर हे जोडपे ताबडतोब आपापल्या कामात व्यस्त झाले. मात्र तरीही त्यांनी एकमेकांना क्वालिटी टाईम देण्याचा प्रयत्न केला आहे. दोघांनीही लग्नानंतर आपला पहिला ख्रिसमस सेलिब्रेट केला. यानिमित्ताने त्यांनी सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेयर केला आहे.

विक्कीने शेयर केलेला हा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. फक्त 13 तासांतच तब्बल 32 लाख लोकांनी या फोटोला लाईक केलं आहे. कमेंट्सचा सुद्धा अक्षरशः यांच्या फोटोला पूर आला आहे. अतिशय सुंदर जोङपं, बेस्ट कपल इन द वर्ल्ड, रब ने बना दी जोडी अशाप्रकारच्या अनेक कमेंट्स त्यांच्या फॅन्सनी केल्या आहेत.

See also  विक्की कौशलचा हा १३ वर्ष जुना व्हिडिओ तुम्ही पाहिलात का? पाहून तुम्हांला देखील येईल खूप हसू

या फोटोमध्ये विक्कीने आपली पत्नी कतरिना हिला घट्ट मिठी मारत हृदयाशी कवटाळून ठेवलं आहे. त्या दोघांच्याही चेहर्यावरील ओसंडून वाहणारा आनंद पाहून ते किती खुश आहेत, याचा आपण अंदाज लावू शकतो. “मेरी ख्रिसमस” असे कॅप्शन देत आणि त्यासोबत “ख्रिसमस ट्री” व हार्ट इमोजी पोस्ट करत त्याने हे फोटोज् शेयर केले आहेत. कतरिनाने सुद्धा तिच्या इन्स्टा स्टोरीवर काही फोटोज् शेयर केले आहेत.

लग्नानंतर अभिनेत्री कतरिना कैफ ही श्रीराम राघवन यांच्या चित्रपटात दिसणार आहे. “मेरी ख्रिसमस” असे या चित्रपटाचे नाव असेल. या चित्रपटाचे शूटिंग सुद्धा तिने सुरू केले आहे. तसेच विक्की कौशल सुद्धा आपल्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईत पोहोचला होता. खरंतर ख्रिसमससाठी तो मुंबईत परतला.

See also  25 दिवसांच्या शूटिंगचे तब्बल इतके लाख रुपये फीस आकारतात तारक मेहता मालिकेतील जेठालाल!

अभिनेता विक्की कौशल हा लवकरच गोविंदा मेरा नाम, द ग्रेट इंडियन फॅमिली, तख्त, सॅम बहादूर, द इम्पोर्टल अश्वत्थामा इत्यादी चित्रपटांत दिसणार आहे. तसेच कतरिना कैफ ही जानेवारीत सलमान खान सोबतच्या “टायगर 3” या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment