कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी गुपचूप उरकून घेतला साखरपुडा? त्यांचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेता विकी कौशल आणि मोहक सौंदर्याची क्वीन अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या अफेयर्स च्या चर्चांनी खूप जोर धरला होता. बॉलीवुडचे हे लव्हबर्ङस खूप चर्चेत असतात. का नसणार बुवा…हे दोघेही एक हटके कपल आहे, हे तर सर्वांनाच माहीत आहे. अभिनेता रणबीर कपूर सोबत ब्रेकअप झाल्यावर कतरिना ही बराच कालावधी सिंगल होती. त्यानंतर मग विकी तिच्या आयुष्यात आला व ते दोघेही पाहता पाहता एकमेकांच्या प्रेमात गुंतले.

आतापर्यंत तरी विकी कौशल व कतरिना कैफ यांनी आपल्या रिलेशनशिप विषयी मौन ठेवले होते. परंतु काही दिवसांपूर्वी शेवटी आता अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर याने सर्व काही खरेखुरे सांगितले. तो म्हणाला की,”विकी कौशल व कतरिना कैफ हे दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत आणि हे खरं आहे.” असे सांगत त्याने त्यांच्या रिलेशनशिप वरील पर्दाफाश केला.

See also  कॉलेजच्या दिवसांपासून सुरेश रैनाला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री, सुरेश रैनाने केला पहिल्या प्रेमाचा खुलासा...

अहो, पण आता तर ह्या दोघांनीही गुपचूप आपला साखरपुडा देखील उरकून घेतला आहे. एवढंच नव्हे तर ह्या दोघांचा रोका सेरेमनी झाल्याचेही समजते. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने याविषयी ट्विटरवर एक पोस्ट शेयर केली आहे. “कतरिना व विकीने साखरपुडा केला, ही अफवा आहे. या दोघांनीही रोका केल्याचे म्हटले जाते.

katrina vicky.jpg?icd2GaIhCXF

या दोघांचीही रोका सेरेमनी नुकतीच झाल्याचे समजते. परंतु त्यांच्या घराबाहेर कोणत्याही प्रकारची सजावट केली गेलेली नाही. तसेच अजूनपर्यंत विकी व कतरिना यांनी देखील काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

अशी सुरू झाली होती विकी व कतरिना यांची लवस्टोरी : कतरिना कैफ व विकी कौशल यांना एकमेकांच्या जवळ आणण्यामध्ये करण जोहर याचे मोलाचे कार्य आहे. करण जोहर हा इंङस्टीमधील एक मोठा दिग्दर्शक व निर्माता आहे. तसेच तो बॉलीवुड मधील पार्टी होस्ट म्हणून देखील ओळखला जातो. करण च्या पार्टी मध्ये बहुतेकदा विकी व कतरिना हे एकत्रित दिसलेले आहेत.

See also  या बॉलिवूड अभिनेत्रींची स्वतःच्या लग्नात रडून रडून झाली होती अशी अवस्था, ३ नंबरची अभिनेत्री तर...

84243474

तसेच विकी व कतरिना यांच्या रिलेशनशिपची सुरुवात ही करण जोहर च्या कॉफी विथ करण या शो मध्ये झाली होती. 2018 मध्ये “कॉफी विथ करण” या शोमध्ये कतरिना काऊचवर बसली होती. तेव्हा करणने तिला प्रश्न विचारला होता की तुझ्यासोबत कोणत्या हिरोची जोङी अगदी परफेक्ट दिसेल? यावर कतरिनाने लगेचच विकी कौशल असे उत्तर सांगितले होते.

त्यानंतरच्या कॉफी विथ करण च्या शो मध्ये करणने हीच गोष्ट विकी कौशल च्या कानावर घातली होती. त्यावर विकी म्हणाला होता की, “हे ऐकून तर मी आनंदाने बेशुद्ध पडेल.” तुम्हांला ठाऊक आहे का, कॉफी विथ करण च्या या एपिसोड नंतर जवळपास वर्षभरानंतर लगेचच विकी कौशल व कतरिना कैफ हे एकत्रित दिसू लागले होते.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री लग्नाअगोदरच होत्या गरोदर, अभिनेत्री श्रीदेवी तर...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment