खळखळून हसवणारे जेष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांची पत्नी देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, नाव जाणून थक्क व्हाल!
मनोरंजन क्षेत्रात काम करणारे कलाकार हे मराठीतले असो किंवा बॉलिवूड मधील त्यांच्या आयुष्यातील जीवनसाथी हा नेहमी त्याच क्षेत्रातील निवडतात. आता याला कारणे ही अनेक असतील की त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला सगळं माहीत असतं. विश्वास लवकर बसतो. याशिवाय काही व्यक्तिगत कारणे ही असतील. त्याच सोबत जर दोघेही नवरा बायको अभिनेते अभिनेत्री म्हणून काम करत असतील तर पैश्याचा तुटवडा ही कधीच जाणवत नाही.
तर आज आपण अश्याच मराठी मधील जेष्ठ हास्यसाम्राट असणाऱ्या आणि लक्ष्या, अशोक सराफ यांच्या सोबत आपलं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्याच्या आयुष्याबाबत जाणून घेणार आहोत. ज्याची पत्नी सुद्धा आहे एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री. चला तर मग.
एक अभिनेता असा अवलिया आहे की मराठी चित्रपट म्हणा किंवा नाटक आपल्या सहज सुंदर अभिनयाने विजय कदम ( vijay kadam ) ते उत्कृष्टरित्या साकारताना पाहायला मिळतात. नुकतीच आयपीएल दरम्यान एका जाहिरातीत ते ऋषभ पंत ह्यांचा कॅच पकडताना पाहायला मिळाले हावभाव आणि टायमिंग ह्यात त्यांनी मस्त जुळवून आणली.
टोपी घाला रे बच्चे सबसे अच्छे,मधुचंद्राची रात्र, देखणी बायको नाम्याची, तोचि एक समर्थ अशा अनेक मराठी ( marathi ) चित्रपटात काम करून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. विजय कदम यांनी ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या चित्रपटात अभिनेत्री अश्विनी भावेच्या ( Ashvini bhave ) पतीची भूमिका साकारली. त्यांनी आजपर्यंत साकारलेल्या सगळ्याच भूमिका या फार गाजलेल्या आहेत. विजय कदम हे हास्य वाले अफलातून रसायन आहे.

त्यांची नाटकं ही एकेकाळी खूप गाजायची. त्यामध्ये सही दे सही, टूर टूर, पप्पा सांगा कुणाचे ही त्यांची नाटके देखील तुफान गाजली. आता आपल्याला एक प्रश्न पडलाच असेल की त्यांनी आयुष्यात लग्न गाठ कुणाशी बांधली ? विजय कदम यांच्या पत्नी पद्मश्री जोशी ( padmashri joshi ) यांच्याशी लग्नगाठ बांधली.
ह्यांची हि प्रेम कहाणी थोडी हटके आहे एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, विजय कदम यांनी दोनदा प्रपोज करूनही त्यांनी लग्नाला नकार दिला होता परंतु “विच्छा माझी पुरी करा” या नाटकातील विजय कदम यांनी साकारलेल्या भूमिकेमुळे त्या त्यांच्या प्रेमात पडल्या आणि आपला होकार कळवला.
विजय कदम यांना पदमश्री जोशी यांच्यासोबत प्रेम झालं होतं. त्यामुळे त्यांनी स्वतःहून प्रपोज करून ते व्यक्त केलं आणि मग काय हळूहळू का होईना पण त्यांची गाडी वैवाहिक मार्गावर आली अभिनेत्री बायको जोशी यांच्यासोबत.
विजय कदम ( vijay kadam ) आणि पद्मश्री जोशी ( padmshri joshi ) ह्यांनी अनेक चित्रपटात एकत्र कामे देखील केली आहेत. ‘नणंद भावजय’ या चित्रपटात पदमश्री यांनी नणंदबाईंची भूमिका साकारली. ‘ चंपा चमेली की जाई अबोली ‘ हे त्यांच्यावर चित्रित झालेलं गाणं विशेष गाजलं. पोरीची धमाल बापाची कमाल, नवलकथा या चित्रपटात त्यांनी काम केले. ज्येष्ठ गायिका तसेच संगीत शिक्षिका सुषमा जोशी या अभिनेत्री पद्मश्री जोशी यांच्या आई. त्यांना एक बहीण आणि एक भाऊ आहे.
बरं आजपर्यंत दोघा नवरा बायको यांनी जे काही चित्रपट साकारलेले आहेत ते सर्व लोकप्रिय झालेले आहेत. म्हणजे खरं तर वैवाहिक आयुष्यात उतरलेल्या विजय कदम यांना खूप यश मिळत गेलं. ज्यात त्यांच्या बायकोचा वाटा ही आहेच.
बरं कसं असतं एखादा कुणी पूर्वज जरी या इंडस्ट्रीत असला की मग पुन्हा गरज नसते कशाची. त्यानंतर ची पिढी सतत या क्षेत्रात जोमाने काम करत राहते. पूर्वजांची पुण्याई म्हणून. तसे या दोघांच्या नातेवाईक हे सगळे इंडस्ट्रीत चांगलं नाव कमावताना दिसत आहेत. याचा खरच खूप अभिमान वाटतो.
भाऊ मास्टर अलंकार ( master alankar ) हा देखील बॉलिवुड ( bollywood ) सृष्टीत एक बालकलाकार म्हणून आपले नाव लौकिक करताना दिसला. त्यानंतर तो परदेशात जाऊन आपला ५०० कोटींची उलाढाल असलेला बिजनेस सांभाळत आहे. तर छोटी बहीण पल्लवी जोशी ( pallavi joshi ) हि देखील मराठी रंगभूमी तसेच बॉलीवूड मध्ये झळकलेली अभिनेत्री.
पल्लवी जोशी हिने एक बालकलाकार म्हणून बॉलिवूड सृष्टीत आपला जम बसवला होता. आदमी सडक का, डाकू और महात्मा, छोटा बाप, रक्षाबंधन, दोस्त असावा तर असा या चित्रपटातून बाल भूमिका बजावून क्रोध, मृगनैनी, मिस्टर योगी, तलाश, ग्रहण, रिता, अल्पविराम यासारख्या मालिका आणि चित्रपटात प्रमुख भूमिका बजावल्या.
प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यासोबत पल्लवी जोशी हिने लग्न केले. हल्ली अनेक अभिनेते आणि अभिनेत्री त्यांच्या कामातील किंवा अभिनेत्यांशीच विवाह करणे पसंत करतात असं नाही तर हे अनेक वर्षांपासून घडतं आलेलं आहे कारण ते एकमेकांना चांगलं समजून घेतात आणि ह्यामुळेच अनेक कलाकार हे अभिनेत्रींशी लग्न करताना पाहायला मिळतात. जे आम्ही वर सांगितले आहे ते आता खाली वाचून आपल्याला पटलच असेल.
तर अश्या प्रकारे विजय कदम आणि पत्नी पदश्री जोशी या सुख समाधानाचं आयुष्य दोघे जगत आहेत. आणि असेच जगावं न माणसाने. तर त्या दोघांना ही त्यांच्या कुटुंब सहित पुढील आयुष्यात यशस्वी वाटचाली साठी खूप शुभेच्छा. स्टार मराठी कडून.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.