प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळे पडलीये या मराठी अभिनेत्याच्या प्रेमात, जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता…
सेलिब्रिटी मंडळींना सोशल मीडियावर फोल्लो करणारे अनेक लाखो चाहते असतात. त्यामुळे सेलिब्रिटी यांच्यावर तीक्ष्ण नजर चाहत्यांची असते. ते काय करताय काय नाही. आणि कसं असतं मनोरंजन क्षेत्रात तर एकत्र काम केलं की आधी अभिनेते अभिनेत्री यांच्यात मैत्री होते.
पुढं या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं आणि मग प्रेमाचं लग्नात. तर हे सगळं आणि त्याचा प्रवास त्यांचा चाहता वर्ग हा सोशल मीडियावर होणाऱ्या पोस्ट वरून अंदाज लावून पाहत असतो.
सध्या मराठी मधील एक तरुण जोडी एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर सोबतचे टाकत आहेत. म्हणजे ते सांगत नाहीत की आम्ही सोबत आहोत पण फोटो वरून तरी लक्षात येतं एकंदरीत. तर ते दोन यंग सेलिब्रिटी कोण हे जाणून घेऊ सविस्तर.
कसं असतं माहितेय का ? कलाकार मंडळींच्या खासगी जीवनाविषयी रसिकांना म्हणजेच चाहत्यांना जाणून घेण्याची इच्छा असते. आपल्याला आवडणारे अभिनेते नेमकं काय करताय वगैरे वगैरे. त्यांच्या जीवनातील लहानसहान गोष्टी जाणून घ्यायला रसिक आतुर असतात. कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांशी संवाद साधतात.
आपल्या जीवनातील गोष्टी, फोटो ते सोशल मीडियावर शेअर करतात. तसेच एकत्र काम करत असताना कलाकारांमध्ये प्रेमांकुर फुलू लागतात हे तर जगजाहीर आहे. असंच काहीसं शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी या दोघांबद्दही घडले आहे.’डावीकडून चौथी बिल्डिंग’ या विराजसच्या नाटकात शिवानीनं अभिनय केला होता. तेव्हाच दोघांची एकमेकांसह ओळख झाली होती.
अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या दोघांचीही जबरदस्त चर्चा सोशल मीडियावर रंगते. विराजस आणि शिवानी एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही सतत एकमेकांसह खास फोटो शेअर करत असतात. चाहत्यांनाही या दोघांमधली केमिस्ट्री प्रचंड आवडते. लाईक्स आणि कमेंटस देत चाहते त्यांच्या वर्षाव करत असतात. दोघांचाही सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.
कारण त्यांनी आत्तापर्यंत जेवढं काही काम केलं आहे ते इतकं चोख आहे की हे चुकले असं कुणी म्हणूच शकत नाही. त्यामुळे ते दोघे चाहत्यांची खूप पसंतीस खरे उतरत आहेत.
सध्या विराजस कुलकर्णी छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे. ही मालिका सध्या निर्णयाक वळणावर आहे. मालिकेच्या कथानकातील ट्विस्ट आणि टर्न्समुळे मालिका रसिकांना भावतेय. तर विराजस कुलकर्णीलाही या मालिकेमुळे प्रचंड रसिकांचे प्रेम मिळतंय.
विराजस फक्त अभिनय करत नाही तर तो एक दिग्दर्शकही आहे. तर शिवानी ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत झळकत आहे.यापूर्वी तिनं ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा’ या मालिकेत बाबासाहेबांची पत्नी रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारली होती.
पहिल्यांदाच शिवानीने विराजससोबत फोटो शेअर केला आहे असे नाही. यापूर्वीही शिवानीनं अनेकदा विराजससोबतचे फोटो शेअर केले आहेत.शिवानी आणि विराजस काही वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.
विशेष म्हणजे दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल प्रत्यक्ष कबुली दिली नसली तरी सोशल मीडिया अकाउंट पाहिले असता त्यात दोघांच्याही सोशल मीडिया पेजवर एकमेकांचे अनेक फोटोज् आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे हे फोटो पाहिले असता कोणालाही ते रिलेशनशीपमध्ये असल्याची खात्री पटते. यावरुन हे दोघे त्यांचे रिलेशनशीपबद्दल उघडपणे बोलतजरी नसले तरी ते लपवतही नाही हेच समजते.
शिवानी आणि विराजस ही जोडी खूप सुंदर आहे. त्यांच्या जोडीने लवकरच पुढचा ही निर्णय घ्यावा असं चाहत्यांना वाटतं. आता बघुयात ते दोघे नात्यावर काय बोलतायत. पण स्टार मराठी कडून मात्र दोघांना पुढील भावी वाटचाली साठी स्टार कडक शुभेच्छा. अशीच उत्तमोत्तम कामं करत रहा.