‘माझा होशील ना’ मालिकेतील लाडका आदित्य पडलाय या मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात, नाव ऐकून थक्क व्हाल!

लग्न, प्रेम, डेट करणं सारंकाही आजच्या जमान्यात क्षणभरात सहज आणि सोप्प झाल्यासारखं वाटतं. तुम्हाला वाटेल असं का? तर त्याला कारणही तसचं विशेष आहे. मराठी सिनेसृष्टीतल्या आज चांगल्या जोड्या विवाहबद्ध झाल्या, काही पुढच्या आठवड्याभरात होण्याच्या मार्गावर आहेत.

काही जोड्या एकमेकांना डेट करत आपल्या आयुष्याबद्दल काही ना काही सोशल मीडियावर शेअर करत राहतात तर काहींच्या मनात प्रेमाची गोष्ट उमटू लागलेली असते. ही बात काहीशी तशीच आहे, सध्याच्या “माझा होशील ना” या झी मराठीवरील मालिकेमधून महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेला पडद्यावरचा आदित्य अर्थात विराजस कुलकर्णी हा कुणा खास व्यक्तीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण चढलं आहे.

80456235

विराजस कुलकर्णी हा माझा होशील ना या मालिकेत सईला डेट करतो आहे परंतु खऱ्या आयुष्यात त्याच्या जीवनात शिवानी असल्याची शक्यता अधिक आहे. शिवानी मराठी सिनेसृष्टीतला एक निरागस, सोज्वळ, गोड आणि प्रचंड प्रसिद्ध असा चेहरा आहे. स्वत:च्या सिनेमातील भुमिकांमधून तिने रसिकप्रेक्षकांवर आपली छाप उमटवली आहे.

READ  "तुझ्यात जीव रंगला" फेम राणादाच्या या फोटोने सोशल मीडियावर घातला धु'मा'कू'ळ, कारण ऐकून थक्क व्हाल!

मालिका, नाटक, चित्रपट सर्वच क्षेत्रात तिने काम केलं आहे व यापुढेही ती ते करते आहे. स्टार मराठीवर पार पडलेल्या “डाॅ. बाबासाहेब आंबेडकर – महामानाची गौरव गाथा” या मालिकेत रमाबाईंची जबाबदारीची भुमिका पार पाडली होती. शिवानी सध्या “सांग तू आहेस ना?” या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस उतरली आहे.

MX 5f1ade7f98ec5

विराजसबद्दल सांगायच झालं तर तो एक लेखक, दिग्दर्शक, कलाकार तिन्ही भुमिका चोखंदळपणे पार पाडणारा कलावंत आहे. त्याने अनेक प्रायोगिक नाटकांच व सोबतच सिनेमांचदेखील लेखन केलं आहे. अनेकांना कदाचित माहित नसेल पण विराजस हा लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे.

शिवानी आणि विराजस दोघे एका नाटकादरम्यान एकमेकांना भेटले होते. “डावीकडून चौथी बिल्डींग” या विराजसच्या प्रायोगिक नाटकात शिवानीने काम केलं होतं. विराजसने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शिवानीचे काही फोटोजदेखील शेअर केले आहेत. मागच्या १५ फेब्रुवारीला अर्थातच “व्हॅलेंटाइन डे” च्या दुसर्‍या दिवशी शिवानीने आपल्या अकाउंटवर विराजस सोबत फोटो टाकत कॅप्शनमधे हार्ट इमोजी टाकला होता, नेमकं तेव्हाचं अनेकांनी त्यांच्यात चाललेल्या प्रेमाबद्दल माहिती हेरली.

READ  'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्री ईशा केसकर पडलीये या प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात, नाव ऐकून थक्क व्हाल!

virajas and shivani 2

व सर्वच ठिकाणी ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली. अजूनतरी दोघांनी त्यांच नात जाहिरपणे मान्य केलं नाही, तरीही दोघे मात्र सतत आपल्या अकाउंटवरून एकमेकांचे फोटो शेअर करत असतात, हे थोडसं चकीत करणार आहे.

नुकतच पार पडलेल्या सिद्धार्थ मिताली च्या लग्नात शिवानी व विराजस चक्क मॅचिंग कपड्यात लग्नाला हजर राहिले होते, दोघांनी तिथेही एकत्र फोटो काढून शेअर केले आहेत. विराजस व शिवानी आता सर्वात लोकप्रिय चर्चेतली जोडी ठरत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

READ  “सुंदरा मनामध्ये भरली” मालिकेमधील ही प्रमुख अभिनेत्री सेटवर ढसाढसा र'डली, कारण ऐकूण तुम्ही हैराण व्हाल!

Leave a Comment