मुलीच्या लग्नात वडीलांचा भन्नाट डान्स, पहा सुर्वे काकांचा व्हायरल झालेला डान्स व्हिडिओ…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सोशल मीडियावर आज अनेक बातम्या, अनेक फोटो, अनेक बाबींची माहिती आणि खुप सारे व्हिडिओ शेअर होत असल्याच आपण रोज पाहतो. सध्या अशातच एक व्हिडिओ रोज तुफान व्हायरलं होतं असल्याच पहायला मिळतं आहे. हा व्हिडीओ आहे एका डान्सचा. आणि हा डान्स साधासुधा नसून तो केला आहे एका 78 वर्षांच्या व्यक्तीने, ज्यांना म्हटलं जातं सुर्वे काका.

मुळच्या साताऱ्या या जिल्ह्यातील असलेले वाईमधील चित्रा टॉकीजचे मालक कैलास सुर्वे यांनी आपल्या मुलीच्या लग्नात थेट स्टेजचं दणाणून सोडलं आहे. सध्या त्यांच्या या अवताराला पाहून सोशल मीडियावर त्यांची फारच चर्चा रंगली आहे. कैलास सुर्वे यांनी अमिताभ बच्चन यांच्या “खायके पान बनारसवाला” या गाण्यावर स्टेजवर ठुमका धरत हा डान्स केला आहे.

See also  कंबोडिया देशातील या अंगकोर वाट मंदिराचे रहस्य तुम्हाला माहित आहे का?

लग्नासाठी आलेल्या अनेक मंडळींसोबत इतर सोशर मिडियावरील मंडळींचीही मने त्यांनी या आपल्या अदाकारीच्या नमुन्यातून जिंकून घेतल्याचं पहायला मिळत आहे. सहसा अनेक माणसांची साठी ओल्यांडल्यानंतरदेखील त्यांची फारशी शरीराची हालचाल होत नाही.

परंतु इथे तर चक्क डान्स आणि तोदेखील साठीमधेही नाही तर थेट 78 व्या वर्षी. सुर्वे यांनी केलेल्या या डान्सचा व्हिडिओ उपस्थित असलेल्या लोकांनी मोबाईलमधे शूट करत सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केला. आणि अनेक लोकांकडून याला सकारात्मक प्रतिसाद येत गेल्याने हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधे सुर्वे यांनी ज्याप्रमाणे डान्स केला आहे कदाचित तो अनेक तरूणांनाही करता येईल का याची साशंकता आहे. अगदी अमिताभ बच्चन यांच्याच पावलावर पाऊल ठेवल्याप्रमाणे हा तंतोतंत डान्स सुर्वे यांनी केला आहे.

See also  कोट्यावधींची मालमत्ता असूनही हे बॉलिवूड कलाकार राहतात चक्क भाड्याच्या घरात, 3 नंबरची अभिनेत्री तर...

सुर्वे यांनी हा डान्स व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या एका जुन्या आठवणीला उजाळा दिला. ते म्हणाले की, वीस वर्षांपूर्वी मी एका गणेश उत्सवाच्या कार्यक्रमात असाच डान्स केला होता, तोदेखील प्रसिद्ध झाला होता. अनेकांनी त्यावेळी माझ्यातल्या छुप्या कलाकृतीची तारीफ केली होती.

त्यावेळी वाईमधे अनेकांपर्यंत मी त्या डान्सच्या परफाॅर्मंसमुळे पोहोचलो होतो. सुर्वे यांनी यावेळी त्यांच्या जुन्या मित्राचीही आठवण सांगितली. ते म्हणाले, हा डान्स मी इनूस याला समर्पित करत आहे. तो मला सोडून गेला आहे. परंतु त्याच्यामुळेच आज माझ्यातली ही कला इतरांना पहायला मिळाली आहे.

इनूस हा मृत्युमुखी पडला असल्याने त्याच्या आठवणी ताज्या झाल्यावर सुर्वे यांना अश्रु अनावर झाले होते. कैलास सुर्वे यांच्या या कलाकृतीवरून अनेकांनी त्यांच्या कलेच कौतुकही केलं आहे. शिवाय त्यांच्या या खास गोष्टीची दादही दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुर्वे यांना लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

See also  अखेर 'त्या' मूलीचा CCTV मध्ये झाला पर्दाफाश, पण त्या टॅक्सी ड्रायव्हरला तुरुंगात डांबले...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Kiran Pawar

Kiran Pawar

Leave a Comment