पंजाब विरुद्ध मुंबई आयपीएल सामन्यात वायरल झालेली ‘सुपर ओव्हर गर्ल’ आहे तर कोण? नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

काही दिवसांपूर्वी इंडियन प्रीमियर लीगमध्ये यांच्यात रोमांचक सामना खेळला गेला होता. तेथे पंजाबने दोन सुपर ओव्हर खेळल्यानंतर मुंबईला पराभूत केले. 36 वा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला होता. श्वास रोखणाऱ्या या किंग्ज इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात, प्रेक्षकांच्या नजरा एका रहस्यमय मुली कडे होत्या. सुपर ओव्हर दरम्यान कॅमेर्‍यावर दिसलेल्या या रहस्यमयी मुलीचे नाव चाहत्यांनी ‘सुपर ओव्हर गर्ल’ असे ठेवले.

EkoTjhdXYAIChON?format=jpg&name=large

किंग्ज इलेव्हन पंजाबला या टीम पाठिंबा देण्यासाठी हि रहस्यमयी मुलगी स्टेडियममध्ये आली होती. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हा सामना टाय झाला होता. मग पहिली सुपर ओव्हर देखील टाय झाली.

See also  टिकटॉकने दिला गुलीगत धोका! टिकटॉक स्टार सूरज चव्हाण म्हणतोय सरकारने टिकटॉक बॅन करून...

नंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये जेव्हा मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 11 धावा केल्या त्यावेळेला सामना खूपच रोमांचक वळणावर होता आणि तेव्हा कॅमेरा मॅनने स्टेडियममध्ये कॅमेरा फिरविला आणि मग पडद्यावर चेहरा दिसला तो या ‘सुपर ओव्हर गर्ल’ चा. आता ही रहस्यमयी ‘सुपर ओव्हर गर्ल’ समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

❤️💛❤️💛

A post shared by riana lalwani (@rianalalwani) on

या ‘सुपर ओव्हर गर्ल’चे नाव रियाना लालवानी आहे आणि ती दुबईत राहते. त्यावेळी रिआना लालवानीचा चेहरा एक-दोनदा मोठ्या पडद्यावर दाखविला होता, जो सामन्यादरम्यान खूप तणावग्रस्त होताना दिसला. त्यानंतर ती सोशल मीडियावर इतकी वायरल झाली कि काही लोकांनी तर कॅमेरा मॅनला पुरस्कार देण्याचाहि सल्ला दिला. अनेकांनी तर तिचे फोटो ट्विटरवर शेअर करत तिचे खूप कौतुक केले.

See also  पेगासस स्पायवेअर नेमकं काय आहे, ते कसे कार्य करते, त्याच्या पासून बचाव कसा करावा? जाणून घ्या एक क्लिकवर

मग काय थोड्याच वेळात रियानाचे # सुपरओव्हरगर्ल सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. या सामन्यानंतर रियानाची पीपल फॅन फॉलोइंगही वेगाने वाढली आहे.

Riana Lalwani Meet The Mystery Super Over Girl

सोशल मीडियावर सगळीकडे रियानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तिला इन्स्टाग्रामवर शोधण्यास सुरुवात केली आणि तिला पाहून तिच्या फॉलोअर्सची संख्या वाढू लागली. रियाणाचे सध्या जवळपास 50 हजार फॉलोअर्स झाले आहेत.

रियानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या बायोमध्ये देखील ‘सुपर ओव्हर गर्ल’ असे लिहिले आहे. याबरोबरच रियानाने एक इंस्टा स्टोरीही शेअर केली आहे, ज्यात ति मॅचची क्लिप आणि तिचा फोटो शेअर करताना कॅप्शन देताना म्हणाली कि ‘माझी ब्लू टिक कुठे आहे इंस्टाग्राम’. तसेच तिने तिच्यावर बनलेले मिम्स देखील तिच्या इन्स्टा स्टोरी मध्ये शेयर केले.

See also  इंडियन आयडॉल "सायली कांबळे" चे आलिशान घर तुम्ही पाहिलेत का?? पहा फोटो

क्रिकेट सामन्यादरम्यान महिला फॅनचा फोटो व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही, यापूर्वीही बर्‍याचदा असे घडले आहे.गेल्या वर्षी दीपिका घोष देखील अशीच ‘आरसीबी गर्ल’ म्हणूनही ओळखली जात होती आणि लाखो लोकांनी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट ला जॉइन केले होते आणि काही तासातच तिचे देखील लाखो फॅन्स वाढले होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment