विराट आणि अनुष्काच्या मुलीच्या बाबतीत खरी ठरली या पंडितजींची भविष्यवाणी, मुलीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

मित्रांनो! सोमवार दि. ११ जानेवारी २०२१ अनुष्का शर्मा आणि विरोट कोहलीच्या आयुष्यात नवे पर्व सुरू झाले आहे. अनुष्का आणि विराट एका चिमुकल्या गोंडस मुलीचे पालक झाले आहेत.

माध्यमांच्या वृत्तानुसार, या जोडप्याच्या घरी एक गोंडस परी म्हणजेच कन्यारूपी अपत्य जन्म घेणार असल्याची भविष्यवाणी ही सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित श्री. जगन्नाथ गुरुजी यांनी पूर्वीच केली होती.

ती ११ तारखेला खरी ठरली. महान ज्योतिषी पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी अलीकडेच मीडिया हाऊसशी संभाषणादरम्यान विरुष्काच्या घरी जन्मणाऱ्या अपत्याबद्दल एक भविष्यवाणी केली होती, की, विराट-अनुष्काच्या घरी एक छोटी परी जन्म घेईल. म्हणजे त्यांना एक मुलगी होईल.

एका सुप्रसिद्ध मीडिया न्यूज चॅनलच्या वृत्तानुसार, अनुष्का शर्मा आणि विराटनेही आपल्या मुलीचे नाव काय ठेवायचे हे पण निश्चित केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विरुष्का हे आपल्या मुलीचे नाव अन्वी असे ठेवणार आहेत. अनुष्का आणि विराटच्या नावाचे शब्द एकत्र करून हे नाव तयार झाले आहे.

अनुष्का शर्मा विराट आणि कोहलीच्या घरी जन्मलेल्या या कन्यारत्नाचे नामकरण विराट आणि अनुष्का ज्यांना गुरुस्थानी मानते आणि त्यांच्या सल्ल्यानेच आयुष्यातही लग्नं, मुहूर्त, गृह खरेदी इ. तत्सम मोठमोठे निर्णय घेते,

असे त्यांचे श्रद्धास्थान असलेले महाराज श्री अनंत बाबा यांच्या सल्ल्यानुसार व उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे समजते. असे म्हणतात की हे जोडपे महंत अनंत बाबांना खूप मानतात. लग्नानंतर घर घेण्यापर्यंतचा निर्णय घेताना अनुष्का आणि विराटने बाबांचा सदैव सल्ला घेतला आहे.

विराट कोहलीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले की, ‘आज दुपारी आम्हाला कन्यारत्न प्राप्त झाले असून हे सांगतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही तुमच्या प्रेम आणि शुभेच्छांबद्दल आभारी आहोत.

अनुष्का व आमचे छोटे बाळ, दोघेही ठीक असून, आम्ही आमच्या आयुष्यातील सुंदर क्षण अनुभवत आहोत. आम्हाला आता थोड्या प्रायव्हसीची गरज आहे. आपण सर्व चाहते हे समजून घ्याल अशी अपेक्षा आहे.

अनुष्का आणि विराटने ११ डिसेंबर २०१७ रोजी इटलीमध्ये लग्न केले होते. ११ जानेवारी २०२१ रोजी त्यांच्या घरी कन्यारत्न जन्मले. त्यामुळे विराट म्हणतो की, “११ तारखेने दोन वेळा आम्हाला आयुष्यातील सर्वोच्य आनंद दिला आहे. आणि म्हणूनच या ११ तारखेस आमच्या आयुष्यात महत्व आहे. ” समस्त भारतीय क्रिकेट तसेच चित्रपट रसिक आणि आमच्या सर्व स्टार मराठी परिवाराकडून विराट आणि अनुष्काला अनेक शुभेच्छा!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment