विराट कोहलीवर कोसळला दु:खाचा डोंगर, खूप जवळच्या व्यक्तीचे झाले निधन…

आपला टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली हा इंग्लंड दौऱ्याच्या तयारीत सध्या व्यस्त आहे. याच दरम्यान एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. आपल्या विराटला लहानपणी बॅटिंग शिकवणारे त्याचे गुरू “सुरेश बत्रा” यांचे दुःखद निधन झाले आहे. ते 53 वर्षांचे होते. पश्चिम दिल्लीच्या क्रिकेट अकॅडमी मध्ये राजकुमार शर्मा यांच्या अकॅडमी मध्ये विराट कोहलीने क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आहे.

सुरेश बत्रा हे त्या अकॅडमी मध्ये सहाय्यक कोच होते. तेव्हा त्यांनीच सर्वप्रथम विराट कोहलीची गुणवत्ता ओळखली होती. वरिष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार “सुरेश बत्रा हे गुरुवारी सकाळी पूजा करताना अचानकच खाली पडले. त्याच दरम्यान त्यांचे नि’ध’न झाले.”

विजय लोकपल्ली यांनी सुरेश बत्रा यांचा एक फोटो शेयर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विराट कोहली सुप्रसिद्ध होण्याआधी राजकुमार शर्मा आणि सुरेश बत्रा या दोघांनी त्याच्यामधील सुप्त गुणांना वाव दिला होता. त्याचप्रमाणे 2018 मधील अंङर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल मध्ये शतकांवर शतक करणाऱ्या मनजोत कालाराला देखील बत्रा यांनीच प्रशिक्षण दिले होते.

सुरेश बत्रा यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांना विराट कोहलीचे कौशल्य सर्वप्रथम कधी जाणवले, याबद्दल एक किस्सा सांगितला होता. “अंङर 14 मॅचमध्ये विराटने एक हटके शतक केले होते. त्या मॅचमध्ये विराटने एक बॉल खूपच सहजपणे ओळखला होता.

त्यानंतर मीङ विकेटच्या दिशेला सिक्स मारला. तो शॉट तर एका 10 वर्षांच्या मुलासाठी देखील अफलातुन शॉट होता.” याच सिक्समुळे विराट मधील कौशल्य, त्याचे गुण मला पहिल्यांदा जाणवले, अशी जुनी आठवण सुरेश बत्रा यांनी शेयर केली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  रणवीर सिंगच्या या सवयीमुळे अभिनेत्री दीपिका पदुकोन झाली आहे खूपच त्र'स्त, ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment

close