क्रिकेटपटू विराट कोहलीवर होणार कडक कारवाई, अडकला आहे फार मोठ्या वादात…
इंडियन क्रिकेटपटू विराट कोहली याचे संपूर्ण जगभरात करोडोंच्या संख्येने फॅन्स आहेत. विराट व अनुष्का आपल्या गोंडस मूलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. पण ह’ल्ली तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. मागील महिन्यात इंग्लंड दौऱ्यात भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना गमावला. या सामन्यानंतर इंग्लंड- भारत यांच्यात 4 ऑगस्टपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिका होणार आहेत.
या मालिकेसाठी आता सध्या टीम इंडिया जोरदार सराव करताना दिसत आहे. यादरम्यान ही मालिका सुरू होण्यापूर्वी कर्णधार विराट कोहली मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. विराट कोहलीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेयर केली होती. या शेयर केलेल्या पोस्टमध्ये त्याने “लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी” ची जाहिरात केली.
ही पोस्ट शेयर करताना त्याने ऑलिम्पिकपटूंचा उल्लेख केला. त्याने आपल्या पोस्टमध्ये “लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी” ची पोस्ट शेयर करताना लिहिले आहे की, हा किती आश्चर्यकारक रेकॉर्ड आहे. ऑलिम्पिक मधील 10% खेळाडू हे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी मधील आहेत. त्यामुळे मला आशा आहे की,”पुढील काळात लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी क्रिकेट मध्ये सुद्धा आपल्या खेळाडूंना पाठवेल. जय हिंद.”
विराट कोहलीच्या या पोस्टनंतर त्याच्यावर सर्वांनी टीका केली. पण आता एङव्हटायझिंग स्टँडर्ड काऊन्सिल ऑफ इंडियाने विराट कोहली विरूद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार एङव्हटायझिंग स्टँडर्ड काऊन्सिल ऑफ इंडिया, विराटला नोटीस पाठवेल.
त्याचप्रमाणे ASCI च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार पोस्टमध्ये कोणताही खुलासा समाविष्ट केला नाही. जो आता अनिवार्य आहे. ASCI आता जाहिरातदार आणि विराट कोहली याला पत्र लिहित आहे. त्यामुळे आता विराट कोहलीला त्याच्या पोस्ट बद्धल उत्तर द्यावे लागणार आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.