विराट आणि अनुष्का राहत आहेत मुंबईतील या आलिशान घरात, घराची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

विराट आणि अनुष्काने नुकत्याच जन्मलेल्या मुलीच नामकरण केल्याने पुन्हा एकदा सर्वत्र त्या दोघांसमवेत त्यांच्या कपल गोल्सची चर्चा सर्वत्र रंगताना पहायला मिळत आहे. विरूष्काने आपल्या मुलीचं नाव “वामिका” ठेवलं आहे. वामिका हे नाव देवी दुर्गेच्या एका नावावरून ठेवल्याची माहितीदेखील ऐकायला मिळाली आहे.

Virat anushka

या गोड कपलची आजवर घडलेली प्रेमकहानी ही सर्वज्ञात आहे. विराट आज भारतीय क्रिकेटचाच नव्हे तर जागतिक क्रिकेटचा सर्वात मोठा चेहरा आहे. सोबतच अनुष्काच्या बाबतीत सांगायच म्हटलं तर तिने सिनेजगतात स्वत:ची अभूतपूर्व कारकिर्द बनवून ठेवली आहे.

विराट कोहलीने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियातील टेस्ट सिरीजमधून पहिल्या टेस्टनंतर माघार घेत पॅरेंटल लिव्ह अर्थात मुलीच्या आगमनासाठी अनुष्कासोबत हजर राहण्यासाठी सुट्टी घेतली होती. विराटच्या गैरहजेरीतदेखील भारतीय संघाने चांगलीच कामगिरी केली. विराटच्या नावावर आजपर्यंत अनेक विक्रम आहेत.

See also  बिग बॉस विजेती ही अभिनेत्री झाली किन्नर, फोटो व्हायरल, कारण जाणून थक्क व्हाल!

भारतीय संघ एखाद्या धावसंख्येचा जेव्हा पा’ठ’ला’ग करत असतो तेव्हा विराट एकप्रकारे खंबीरपणे उभा असतो हे बऱ्याचवेळा पहायला मिळतो. दुसरीकडे अनुष्काने आपल्या सिनेमांमधून आजवर रसिकप्रेक्षकांवर आपली वेगळी छाप पाडण्यात कुठलीच कसर सोडली नाही.

अशा या मोस्ट सक्सेसफुल ठरलेल्या जोडीच्या नेहमी चांगल्या गोष्टी आपल्याला सोशल मीडियावर चर्चेत पहायला मिळत असतात. तर आता ही बात अशीच आहे ती म्हणजे विराट आणि अनुष्का या जोडीचं मुंबईत आलीशान असं घर आहे, तुम्ही त्याला महालापेक्षा कमी म्हणूनच शकणार नाही अशी त्याची रचना आहे. चला तर मग पाहुयात याविषयीची खास बात.

95beaf8c 7635 489f bcd6 8afd88cad635

तुम्हाला काही फोटोंमधून विरूष्काच्या आलीशान घराबद्दलची जाणिव आपोआपच होऊन जाईल हे निश्चित. विराट आणि अनुष्काने मुंबईत एक अपार्टमेंटमधे फ्लॅट खरेदी केलेला आहे त्या महालासारख्या राजघरात आता विराट आणि अनुष्का यांची मुलगी वामिका एका राजकन्येप्रमाणे राहणार आहे.

See also  सहा वर्षांपासून फक्त एका किडनी वर जगतेय ही अभिनेत्री, हॉस्पिटलमधून व्हिडिओ शेअर करत केले मदतीसाठी आवाहन...

अनुष्कासोबत लग्न झाल्यावर विराट मुंबईतल्या ओमकार नावाच्या अपार्टमेंटमधे राहतो आहे. ज्याच्या ३५ व्या मजल्यावर त्यांच घर आहे. विराट आणि अनुष्का पहिल्यांदा २०१७ मधे या घरात रहायला आले होते. जवळपास नाही म्हणता ४ बीएचकेचा या फ्लॅटची किंमत ३४ कोटींच्या घरात जाते असल्याच कळतं.

15912784865ed8fb963f604

हा फ्लॅट समुद्राच्या दिशेकडे फेसिंग केलेला आहे, ज्यामुळे येथून सी व्हिवू नजाऱ्याचा अगदी मनसोक्त आनंद लुटता येतो. अनुष्का आणि विराट यांच्या या घरात प्रायव्हेट टेरेसचीदेखील अफलातून सोय आहे. जिथे शक्यतो विराट आणि अनुष्का क्वालिटी टाईम स्पेंड करत असलेले पहायला मिळतं.

या दोघांच्या घराची अनेक विविध वैशिष्ट्ये आहेत, त्यांपैकी एक म्हणजे अनुष्काने घरात एक फोटो शुटिंगसाठी काॅर्नर तयार करून ठेवला आहे, जिथून अनुष्का पाहिजे तेव्हा घरातही फोटोशूट करू शकते. विरूष्काच्या घराच्या आतील अनेक बाबी इन्स्टाग्रामवरील फोटोंमधून बऱ्याचदा पहायला मिळत असतात. अर्थातच ह्या घराला आता राजकन्या मिळाली आहे यात काही शंकाच नाही.

See also  अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी' चित्रपटात लक्ष्मीची भूमिका साकारलीये या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने, नाव ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Kiran Pawar

Kiran Pawar

Leave a Comment