बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम लवकरच अडकणार विवाहबंधनात, पाहा कोण आहे होणारी पत्नी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

टेलिव्हिजनवरील कलर्स वाहिनीवरील “बिग बॉस” हा सर्वांत जास्त लोकप्रिय शो आहे. बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरू असून नुकताच त्याचा ग्रँड फिनॅले देखील झाला आहे. तर आपल्या बिग बॉस मराठीचा विजेता सुद्धा घोषित करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच बिग बॉस च्या घरात पत्रकार परिषद झाली. यावेळी विशाल निकमने केलेल्या वक्तव्यावरून तो बिग बॉस मधून बाहेर आल्यावर ताबडतोब बोहल्यावर चढणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

या एपिसोड मध्ये बहुतेक पत्रकारांनी हजेरी लावली होती. त्यांनी बिग बॉस च्या स्पर्धकांना अनेक प्रश्न विचारले. त्यादरम्यान विशाल ला त्याच्या सौंदर्या विषयी विचारण्यात आले होते. त्यामुळे ही सौंदर्या नक्की आहे का? बिग बॉस मधून बाहेर आल्यावर तिचे खरं नाव काय आहे, हे आता त्याला विचारण्यात येत आहे. तर विशाल म्हणाला की, सौंदर्या खरंच आहे. बिग बॉस च्या घरात मी तिच्यामुळेच राहू शकलो. ती जरी माझ्यापासून लांब असली तरीही बिग बॉस च्या घरात राहण्यासाठी मला तिच्यामुळे शक्ती मिळते.

See also  नववधूच्या वेशात खूपच सुंदर दिसत आहे अभिनेत्री सायली संजीव, फोटो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल!

बिग बॉस च्या घरातून बाहेर पडल्यावर मी सर्वांना तिचे नाव नक्कीच सांगेल. तसेच तिची सगळ्यांसोबत ओळख सुद्धा करून देईल. त्याचप्रमाणे त्याने तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांची मस्करी करत त्यांना आपल्या लग्नाचे आमंत्रण देखील दिले. तर आता विशाल निकम फक्त बिग बॉस च्या घरातून बाहेर आला नाही, तर तो बिग बॉस च्या तिसऱ्या पर्वाचा विजेता देखील ठरला आहे.

त्यामुळे आता तरी विशाल लग्न करणार का? त्याचबरोबर आपली सौंदर्या कोण आहे, हिच्याविषयी तो आता सांगणार आहे का नाही…याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान बिग बॉस मराठीच्या या तिसर्या पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले. यावेळी त्यांनी यंदाची बिग बॉसची ट्रॉफी कशी असेल, याची सुद्धा झलक दाखवली.

See also  अभिनेत्री शिवानी बावकर व शिव ठाकरे पडलेत एकमेकांच्या प्रेमात? त्यांचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

तसेच बिग बॉस मधील मिनल शहा, जय दुधाणे, विशाल निकम, विकास पाटील आणि उत्कर्ष शिंदे या टॉप 5 स्पर्धकांचा जबरदस्त ङान्स परफॉर्मन्स सुद्धा यावेळी पाहायला मिळाला. यादरम्यान मिनल शहा ही बिग बॉस च्या घरातून बाहेर पडली. त्यानंतर उत्कर्ष शिंदेने सुद्धा एक्झिट घेतली. त्यामुळे विकास, विशाल आणि जय हे तिघेजण टॉप 3 स्पर्धक ठरले.

तसेच या तिघांमध्ये सुद्धा अगदी सुरुवातीपासून जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळाली. यामधील विकास पाटील हा पण बाहेर पडला. त्यानंतर जय आणि विशाल ह्या दोघांमधील विशाल हा बिग बॉस च्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला. त्याला बिग बॉस ची अफलातुन सुंदर ट्रॉफी आणि 20 लाख रुपए बक्षीस म्हणून मिळाले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment