बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचे मुंबईमधील हे घर आहे खुपच सुंदर आणि आलिशान, घराची किंमत ऐकून थक्क व्हाल!
बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील कलाकारांची आलिशान लाइफस्टाइल, त्यांची बक्कळ प्रॉपर्टी हे सर्वकाही त्यांनी स्वतःच्या मेहनतीने कमावलेले असते. तर काहीजणांना पारंपारिक वारसा हक्क मिळालेला असतो. आपल्या इंङस्टीमध्ये असे कित्येक स्टार्स आहेत, ज्यांच्या आईवडिलांनी अमाप धनसंपत्ती कमावून ठेवलेली आहे.
परंतु असे देखील कित्येक स्टार्स आपल्या इंङस्टीमध्ये आहेत. ज्यांनी स्वतःच्या जिद्दीने व धैर्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचे नाव कमावले आहे. त्यांच्या अभिनय शैलीला देखील चाहत्यांनी भरपूर प्रेम दिले. मात्र काही काळानंतर ते इंङस्टीमधून दिसेनासे झाले.
क्यूट स्माईलचा किंग अभिनेता विवेक ओबेरॉय हा देखील यांपैकी एक आहे. राम गोपाल वर्मा यांच्या “कंपनी” या चित्रपटातून बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये विवेक ओबेरॉयने एन्ट्री केली होती. त्याचे करियर फार चांगले घडू शकले नाही, पण तरीही तो आपल्या वैवाहिक जीवनामुळे नेहमीच चर्चेत राहिला.
विवेक व ऐश्वर्या रॉय यांचे प्रेमप्रकरण सुद्धा नेहमी चर्चेत राहिले. विवेक ओबेरॉय यांचे घर मुंबईतील जुहू मध्ये आहे. त्याचे घर एवढे सुंदर आणि आलिशान आहे की, जे पाहून तुम्हांला तर आश्चर्य वाटेल.
विवेकच्या मुंबईतील जुहू मधील या आलिशान घराची किंमत सुमारे 14 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या घरात आईवडील, पत्नी आणि दोन मुलं राहतात. त्यांचे हे घर खूप मोठे आहे.
विवेक ओबेरॉयच्या घराचे फोटोज् पाहून आपण समजू शकतो की, ते किती सुंदर आणि उत्कृष्ट आहे. सोशल मीडियावर सुद्धा त्यांच्या या अप्रतिम घराचे फोटोज् वायरल होत असतात. त्यामुळे विवेकच्या वैयक्तिक आयुष्याप्रमाणे त्याच्या घराची देखील चर्चा होत असते.
तुम्हांला ठाऊक आहे का, विवेकचे वडील सुरेश ओबेरॉय हे 1970-80 च्या दशकातील एक नामांकित अभिनेते होते. त्यांनी अमिताभ आणि नसिरुद्धीन शाह यांसारख्या अनेक कलाकारांसोबत काम केले आहे.
विवेक ओबेरॉय यांच्या पत्नीचे नाव प्रियांका असे आहे. त्यांच्या पत्नीचे वडील हे कर्नाटक सरकार मध्ये मंत्री होते. अभिनेता विवेक ओबेरॉय याने आपले घर खूप छान प्रकारे ङेकोरेट केले असल्याचे दिसते. कित्येकदा त्यांच्या घराचे फोटोज् हे सोशल मीडियावर वायरल होताना दिसतात.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.