“या” मराठमोळ्या अभिनेत्याची मालिकेतून झाली हकालपट्टी? राजकीय भूमिका घेतल्याचा होत आहे त्याच्यावर आरोप

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो सोशल मीडियाच्या जमान्यात केव्हा, कधी आणि काय होईल हे काही सांगता येत नाही. कोणत्या पोस्टमुळे केव्हा कोण प्रसिद्धीत येईल आणि केव्हा कुणाच्या नावाची बदनामी होईल, याचा काही एक नेम नाही बुवा. असेच काहीसे या अभिनेत्यासोबत घङले आहे. अभिनेता किरण माने हा सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. अभिनय क्षेत्रासोबतच तो सामाजिक घटकांवर सुद्धा आपले मत व्यक्त करत असतो. त्याप्रमाणेच राजकीय विषयांवर सुद्धा बहुतेकदा त्याने आपले परखडपणे मत व्यक्त केले आहे. यावर कित्येकांनी टीका सुद्धा केली आहे. मात्र त्यामुळे त्याच्या बिनधास्तपणाचा त्याला चांगलाच फटका बसल्याचे दिसत आहे.

See also  "साधेपणा, सोज्वळपणा असलेल्या या महान व्यक्तीला सलाम" मराठी अभिनेत्याने केली पोस्ट शेयर

मराठमोळा किरण माने हा स्टार प्रवाह वाहिनीवरील “मूलगी झाली हो” या मालिकेत काम करत होता. या मालिकेत तो माऊच्या वडिलांची भूमिका साकारत होता. यामधील त्याचे पात्र देखील तितकेच बिनधास्त आणि बेधडक होते. मात्र आता त्याला या मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. मालिकेच्या निर्मात्यांच्या या निर्णयामुळेच सोशल मीडियावर चांगलाच संताप व्यक्त होत आहे. त्याचे चाहते या निर्णयावर अतिशय नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता सोशल मीडियावर कित्येक पोस्ट शेयर करून अनेकजण या गोष्टीचा विरोध करत आहेत.

किरण माने ने काही दिवसांपूर्वीच त्याच्या फेसबुक पेजवरून राजकीय विषयाबद्दल एक पोस्ट शेयर केली होती. त्यामध्ये देखील त्याने बर्याच गोष्टींचा उल्लेख केला होता. त्याच्या या पोस्ट ला कित्येकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता, तर काहीजणांना त्याची पोस्ट मुळीच आवडली नाहीत.

See also  बनावट कथा रचून आमच्या आमदारांचे निलंबन केलंय – फडणवीसांचा गंभीर आरोप

किरणला या मालिकेतून काढण्याचे त्याने सोशल मीडियावर घेतलेल्या परखड राजकीय भूमिका, हेच कारण असावे, असे म्हटले जात आहे. ज्या कारणामुळे त्याला मालिकेतून काढण्यात आले आहे, ते कारण त्याची स्पष्ट राजकीय भूमिका हेच असेल, असे म्हणत सोशल मीडियावर याबाबत संताप देखील व्यक्त केला जात आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment