“सासू शेर तर जावई सव्वाशेर” काय आहे नेमका हा किस्सा, एकदा अवश्य जाणून घ्या.

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सासू- सूनेचं जसं एकमेकींसोबत पटत नाही अगदी तसचं सेम टू सेम सासूचं सुद्धा आपल्या जावयासोबत पटेनासे दिसते की राव…. मित्रांनो तुम्हांला पण याचा अनुभव आलाच असेल केव्हातरी. अहो परंतु घरजावई झालेल्या व्यक्तीचे हाल हे काही विचित्रच असतात की हो…बिचाऱ्याला घरगडी समजून अगदी राबवून घेतले जाते. ढिगभर कामांचा रोजच पसारा त्याच्या नशीबी येऊन पडतो.

अहो, पण एखाद्या भन्नाट वात्रट स्वभावाच्या सासूबाईला गैराट जावई भेटला तर…..हात्तीच्या नादच होईल की हो मग..म्हणजे कसं सासू शेर तर जावई सव्वाशेर…मित्रांनो आज असाच खट्याळ जावयाचा आणि नाठाळ सासूबाईचा एक जबरदस्त ढिंकचाक किस्सा आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

“गावाकडची माणसं” या प्रसिद्ध युट्यूब चॅनेलवर ही वेबसिरीज नुकतीच प्रदर्शित करण्यात आली. यामध्ये सुरूवातीला कामचुकार आई आणि तिची विवाहित मूलगी घरभर कामांचा पडलेला पसारा न आवरता आपल्या जावयाच्या नावाने खङी फोङत बसतात. तो केव्हा येणार आणि केव्हा संपूर्ण घरातील कामं करणार, याची वाट पाहत बसतात. त्यानंतर जेव्हा तो जावई घरी येतो…बस्स ह्या दोघी मायलेकींचा तोंडाचा पट्टा ताबडतोब सुरू होतो. त्यांचे म्हणणे असते की,”जावयाला नुसतं खाऊन गावभर हिंङत बसायला आणलं नाही. तर घरची सगळी कामं करायला खास आणलं आहे.”

See also  टिकटॉक फेम सूरज चव्हाण झळकणार लवकरच "या" मराठी चित्रपटातून, फेब्रुवारीत होणार हा चित्रपट प्रदर्शित

बिचारा जावई आपल्या पत्नी व सासूबाईच्या आदेशानुसार घरची कामं करायला सुरुवात करणार, तेव्हाच त्याला त्याच्या वृद्ध वडिलांचा फोन येतो व त्याला आपली आई आजारी असल्याने ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये न्यायचे असते. परंतु ही कङक सासूबाई काही त्याला जाऊन द्यायला तयार नसते. कारण तिच्या मते आपल्या जावयाची आई म्हातारीचं आहे….बसल्या बसल्या काहीतरी सोंग घेऊन बसली असेल. त्यामुळे त्या जावयाला वॉर्निंग देतात की, अगोदर घरची सगळी कामं आवरायची आणि नंतरच तुमच्या आईकडे जायचं.

साधाभोळा जावई बिचारा निमूटपणे कामं आवरत असताना पुन्हा त्याला आपल्या घरून आईची तब्येत अधिकच बिघडली, असा फोन येतो. मग तो ताबडतोब अर्धवट कामं सोडून तङक आपल्या आईला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी जातो. परंतु इथे, आपण इतके बजावून सांगून देखील जावई अर्धवट कामांचा पसारा टाकून गेला. मग आता उरलेली कामं आपल्याला करायला लागतील, असा कपटी विचार करून ढोंगी सासूबाई पाय घसरून पडल्याचे नाटक करतात.

See also  'दे ध'क्का' मधील सायली आता दिसतेय अशी, तिचे नवीन फोटो पाहून थक्क व्हाल!

आपल्या आईची अशी अवस्था पाहून घाबरलेली मूलगी लगेच आपल्या नवऱ्याला मेडिकल मधून औषध आणायला सांगते. जावई बुवा मात्र सॉलिड हुश्शार, आपल्या सासूबाईचा हा ङाव त्याच्या लगेचच लक्षात आला. घरी गेल्यावर तो आपण आणलेले जालिम औषध सासूबाईला देतो आणि आराम करायला सांगतो.

मग पुढे काय झाले हे सांगण्याची सोय नाही राव….जावयाने आणलेलं जालिम औषध घेऊन सासूबाई दोन मिनिटांत खडखडीत बरी तर झाली आणि तिचं ढोंग सुद्धा उघडं झालं. पण नंतर मात्र तिला खरोखरच पोटदुखीचा त्रास झाला, तेव्हा मात्र ती वैतागली आणि पुन्हा जावयाच्या नावाने बरळायला लागली. थोडक्यात म्हणजे आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या आजारपणात त्वरित धावून जा, त्याला मदत करा. कारण वेळ ही प्रत्येकावर येते. अशाप्रकारे “सासू शेर तर जावई सव्वाशेर” या वेबसिरीज मधून आप्तेष्टांना सहकार्य करण्याचे सांगण्यात आले आहे.

See also  या मराठमोळया अभिनेत्रीने स्वतःच्या लग्नाच्या वरातीत केला पती सोबत डान्स, पहा व्हिडिओ...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment