मराठी सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांची पत्नी आहेत खूपच सुंदर, पहा त्यांचे सुंदर फोटो..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी सिनेसृष्टीतील रुबाबदार व्यक्तीमत्व असलेले अभिनेते सयाजी शिंदे यांना अख्ख्या महाराष्ट्रात सर्वजण ओळखतात. सयाजी शिंदे यांनी फक्त मराठी चित्रपटांतच नव्हे तर तेलुगु, तामिळ, कन्नड, इंग्रजी, मल्ल्याळम, गुजराती आणि हिंदी चित्रपटांत सुद्धा उत्कृष्ट काम केले आहे. आपल्या अप्रतिम अभिनय कौशल्याच्या जोरावरच त्यांनी साऊथ इंडस्ट्रीमध्ये स्वतःची अशी एक वेगळीच हटके ओळख बनवली आहे.

अभिनेते सयाजी शिंदे हे नाव फक्त अभिनयापुरतेच मर्यादित नसून समाजकार्यात देखील त्यांचा सहभाग असतो. मात्र त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी फारच कमी लोकांना ठाऊक आहे. सयाजी शिंदे यांच्या पत्नी आणि मुले ही लाइमलाइट पासून नेहमी दूरच असतात. मात्र त्यांच्या पत्नी ह्या अगदी सौंदर्याची खाण आहेत बरं….

See also  या भारतीय क्रिकेटरसोबतचा चहलची पत्नी धनश्रीचा डान्स व्हिडिओ होतोयं तुफान व्हायरल, पाहून थक्क व्हाल!

सयाजी शिंदे यांनी 1978 मध्ये मराठी एकांकिका नाटकातून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. 1987 मध्ये झुल्वा नाटकातील त्यांचा अभिनय खूप अप्रतिम ठरला. तेव्हापासूनच त्यांना अफाट लोकप्रियता मिळू लागली. त्यानंतर मग सयाजींनी इतर प्रादेशिक भाषांमध्ये अभिनय करण्यासाठी सुरुवात केली.

त्यानंतर 1995 साली “अबोली” या चित्रपटातून सयाजी शिंदे यांनी एक अभिनेता म्हणून मुख्य भूमिका साकारली. त्याचप्रमाणे त्यांनी आतापर्यंत अनेक नाटकांत काम केले आहे. त्यापैकी सखाराम बाईंङर या नाटकातील त्यांच्या अभिनयाची भरपूर स्तुती करण्यात आली होती.

वन रूम किचन, झुल्वा आणि आमच्या या घरात त्यांची ही नाटके मोठ्या प्रमाणात गाजली. त्यानंतर त्यांनी बर्याच मराठी चित्रपटांत काम केले. त्यांपैकी गोष्ट छोटी ङोंगराएवढी या चित्रपटातील त्यांनी कृषी मंत्री म्हणून साकारलेली भूमिका सर्वांच्या आठवणीत राहिली. सयाजी यांनी आतापर्यंत कित्येक चित्रपटात काम केले आहे.

See also  या बॉलीवुड अभिनेत्यासमोर उद्योगपती अंबानी आहेत अगदी शून्य; करोडोंच्या संपत्तीचा आहे हा मालक...

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधित जाणून घ्यायचे झाले तर त्यांच्या पत्नीचे नाव अलका शिंदे आहे. या गोड दाम्पत्याला सिद्धार्थ नावाचा एक मुलगा देखील आहे. त्यांच्या पत्नी आणि मुलगा हे लाइमलाइट पासून नेहमी दूर राहणे पसंत करतात. सोशल मीडियावर तुम्हांला या स्वीट फॅमिलीचे फोटोज् पाहायला मिळतील.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment