चहा आवडतो ?… चहाची पावडर मग फेकून देऊ नका… घरातील पाच कामे होतील सोपी….जाणून घ्या उपयोग…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो भारतात अनेकजण चहाप्रेमी आहेत, सकाळी उठल्यावर किंवा संध्याकाळी पाखरांच्या किलबिल सोबत आपणाला चहा हवा असतो. काहींना कॉफी आवडते, तर काहींना चहा आवडतो. मोजकेच लोक असे असतात ज्यांना चहा आवडत नाही. चहाचे अनेक नमुने आपल्या आवडीनुसार आपण घेत असतो, काहीजणांना गरम, कडक चहा आवडतो तर काहींना सौम्य चहा आवडतो. मित्रहो यामध्ये आपण दूध, साखर आणि चहापावडर व पाणी वापरतो. चहा केल्यानंतर चहापावडर आपण गाळतो व मग चहा पितो.

ही गाळलेली चहापावडर आपण फेकून देतो, तिला आपण निरुपयोगी समजतो. मात्र मित्रहो हीच चहापावडर आपल्या खूप कामी येतो. आपली अनेक कामे सोपी करते. आज आपण लेखाद्वारे जाणून घेणार आहोत की चहा पावडरचे कोण कोणते उपाय आहेत व आपण तिचा कसा वापर करू शकतो. आपण पाहतो की पावसाळ्यात घरात थंड व दमट वातावरण असते, कुबट कुबट वास येत असतो. त्यामुळे घरात फ्रेश वाटत नाही, कंटाळवाणे वातावरण निर्माण होत असते म्हणून हे वातावरण फ्रेश व छान बनवण्यासाठी आपण इथे चहा पावडरचा वापर करू शकतो.

See also  प्रसिद्ध अभिनेत्रीने या कारणांमुळे अर्ध्यातूनचं सोडली “स्वामिनी” मालिका, कारण ऐकून थक्क व्हाल!

जर घराच्या कोणत्याही भागात वास येत असेल, किंवा ओलसरपणा जाणवत असतो. या समस्या त्रास देत असतात, यातून मार्ग काढण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. मित्रहो यावेळी तुम्ही वापरत असलेली चहाची पाने इथे देखील वापरू शकता. ही चहाची पाने खूप चांगली डियोडायझर असतात, सर्वात आधी आपण एका प्लेट मध्ये किचन टिश्यू टाकून ओल्या चहाची पाने वाळवायची आहेत, व ते चांगले वाळल्यावर किंवा सुकल्यावर एका मलमल किंवा सुती कापडात बांधून ठेवायची आहेत. आता या पिशवीत आपण काही थेंब तेल टाकायचे आहे. जिथे वास येतो तिथे ही पिशवी ठेवून द्या.

तसेच ही पाने कोणत्याही पृष्ठभागावरील चिकटपणा काढून टाकण्यासाठी उपयोगी पडतात. चॉपिंग बोर्ड, घाणेरडी भांडी, खिडक्या इत्यादी काही साफ करायचे असेल तर त्यावेळी आपण तिथे कापडाने किंवा स्क्रबने घासून घ्यायचे आहे. या पानांमुळे भांडी देखील खूप स्वच्छ होतात, त्यावरील किटाणू लगेचच नाहीशी होतात. तसेच या पानांचा उपयोग बागकामासाठी देखील होतो, याचे चांगले खत सुध्दा बनवता येते. पण जर चहा बनवताना तुम्ही साखर अधिक घातली असेल तर झाडाच्या मुळांना ते नुकसान पोहचवू शकते.

See also  को'रो'नातून बरा होऊन पुन्हा कामाला लागला हा प्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, "कामच केलं नाहीतर मग..."

वापरलेली चहाची पाने वाळवून रोपांच्या मातीजवळ ठेवा, तुम्हाला आवड असेल तर तुम्ही याचे कंपोस्ट खत बनवू शकता. झाडांची वाढ चांगली व्हायची असेल तर याचा उपयोग होतो. मित्रहो चहा तर उपयोगी असतोच शिवाय याची पावडर सुद्धा खूप उपयोगी असते. आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment