“कुलदैवत” म्हणजे काय? कुलदैवत कसे प्रसन्न करून घ्यावे? कुलदैवत माहिती नसल्यास काय करावे? जाणून घ्या सविस्तर…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

कुळ म्हणजे पूर्वीच्या काळी कोणा एका मूळ पुरुषाने निर्माण केलेले आणि एकमेकांशी रक्ताच्या नात्याने बांधलेले परंतु कालौघात वि’भ’क्त झालेले अनेक कुटुंबं. आप्त संबंधामुळे जे एकत्र येतात अशा एका रक्ताच्या नातेसंबंधाच्या लोकसमूहास समूहास कुळ म्हणतात. कुळ शब्दाला घराणं असे ही म्हंटले जाते.

प्रत्येक घराण्याचे स्वतःचे असे एक आराध्य दैवत असते. त्यांनाच आपण त्या घरण्याचे म्हणजेच कुळाचे दैवत म्हणतो. जेंव्हा आपल्या घरामध्ये कोणतेही मंगलकार्य जसे की, लग्न, वास्तू पूजन इ. असते, ते यथासांग पार पडल्यानंतर आपल्या कुलाच्या आराध्य देवतेच्या दर्शनास जाऊन त्यांचा शुभाशीर्वाद घेणे हे महत्वाचे असते.

Advertisement

आपल्या घराण्याचे कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय ? आपले कुलदैवत कुठले? त्याचे महत्व काय ? कुळाचार म्हणजे नेमके काय ? कुलदैवता संबंधी आपले कर्तव्य काय आहे ?

See also  नवरात्रीमध्ये श्री दुर्गामातेच्या या ९ रूपांची आराधना होते, जाणून घ्या कोणती आहेत ९ रूपे, कोणत्या वैशिष्ट्यांमुळे त्यांना नवदुर्गा म्हणतात...

आजकाल आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे प्रश्न पडतात. पण विचारणार कोणाला? कारण सध्याच्या या मॉडर्न काळात एकत्र कुटुंब पद्धती लोप पावून वि’भ’क्त कुटुंब पद्धती सर्रास अं’गि’का’र’ल्या’मुळे वरील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपल्या घरामध्ये जुनी जाणती मंडळी कोणीच नसतात. मग अशा वेळी घरात एखादे धार्मिक कार्य करायचे ठरतेय किंवा एखादी समस्या अचानक उद्भवते आणि त्यावेळी समजते की आपल्याला आपल्या कुलदैवताची उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे . जेणेकरून हे मंगल कार्य नि’र्वि’घ्न पार पडेल अथवा आलेल्या स’म’स्ये’चे नि’रा’क’रण होईल. अशा प्रसंगी सगळ्यांची पं’चा’ई’त होते. आपली विघ्ने हरण्यासाठी आणि आपली सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून आपल्या कुलदैवताची उ’पा’स’ना करणे आवश्यक असते.

Advertisement

कुलदैवत : कुलदेवता शब्द कुळ आणि देवता या दोन शब्दांनी बनतो. कुळाची देवता तीच कुलदेवता. ज्या घराण्यात देव आपल्याला जन्माला घालतो. त्या घराण्याची मूळ देवता म्हणजेच आपली कुलदेवता. कुळदेव पुरुष असल्यास कुलदेव आणि स्त्री दैवत असल्यास कुलदेवी म्हणतात. या कुलदैवताची उपासना करण्यासाठी आपल्याला आपल्या घराण्याच्या कुलदैवताविषयी अचूक माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. कुलदेवता उपासनेने आपल्या स’म’स्त चिं’ता, स’म’स्या आणि अ’ड’च’णीं’चे नि’वा’र’ण होऊन निश्चितच आपल्याला शुभफळे मिळतात.

See also  हि एक सवय आणू शकते तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप मोठी स'म'स्या, ऐकून विश्वास बसणार नाही!

कुलदेवता उपासना महत्व : अवघे ब्रह्माण्ड व्यापलेली सर्व त’त्वे पिं’डा’त आली की साधना पूर्ण होते. भगवान श्रीविष्णू, भगवान श्रीशिवशंकर आणि श्रीगणेशाची उ’पा’स’ना केल्यास ही त’त्वे प्र’ब’ळ होतातच, पण या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे ब’ळ कुलदेवतेच्या जप व नामस्मरणामधे असते. म्हणून कुलदेवतेचे नित्य नामस्मरण व उपासनेला महत्व आहे.

Advertisement

कुलदैवत माहिती नसल्यास उपाय : एखाद्याला स्वतःचे कुलदैवतच माहिती नसल्यास आणि त्यामुळे धर्मकार्यात बा’धा येऊन खोळंबा होत असल्यास हिंदू धर्मशास्त्रात काही उपाय सांगितलेले आहेत ते म्हणजे…

  • मूळ स्वरुपातील मुख्य देवता : ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिमाया.
  • श्रीविष्णूं अवतार स्वरूप देवता : नृसिंह, राम, कृष्ण
  • श्रीशिवशंकर अवतार स्वरुप देवता : काळभैरव, खंडोबा, मारुती
  • आदिमाया अवतार स्वरुप देवता – सरस्वती, श्रीलक्ष्मी, पार्वती, दुर्गा, चंडी, कालीमाता.
  • गणांचे अधिपती श्रीगणेश हे पूजनेच्या आरंभातील दैवत.
  • देवांचे सेनापती : कार्तिकेय.
  • वैदिक देवता : अग्नी, सूर्य
See also  बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याचे आहे हे महत्त्व जाणून घ्या कसा साजरा करावा दिवाळी पाडवा...

उपरोक्त देवतांपैकी ज्या दैवतावर आपली मनोभावे श्रद्धा, भक्ती आहे त्यांची उपासना केल्यासही कुलदैवत उपासनेची शुभफळे प्राप्त होतात.

Advertisement

कुलदेव किंवा कुलदेवी हे आपल्या कुलाचे व वंशाचे संरक्षण करणारे दैवत असते. त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमीच राहण्यासाठी, आपली सर्वांगीण प्रगती होण्यासाठी, वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी, कुलदेवाच्या दर्शनास अवश्य जाऊन यावे.
शुभं भवतु: !

Advertisement

Leave a Comment

close