पेगासस स्पायवेअर नेमकं काय आहे, ते कसे कार्य करते, त्याच्या पासून बचाव कसा करावा? जाणून घ्या एक क्लिकवर

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मोबाइलमध्ये हेरगिरी करणारे पेगासस स्पायवेअर (Pegasus Spyware) भारतात पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यापूर्वी भारतात 2019 मध्ये या स्पायवेअरबद्दल ऐकण्यात आले होते. त्यावेळी अनेक Whatsapp वापरकर्ते पेगाससद्वारे हेरगिरीस बळी पडले होते. यात अनेक मोठे पत्रकार आणि विरोधी पक्षांचे कार्यकर्ते यांचा समावेश होता. अनेक प्रमुख वेबसाइटच्या वृत्तांनुसार या वायरसद्वारे भारतातील 40 पेक्षा जास्त पत्रकार, कार्यकर्ते आणि इतर महत्वपूर्ण लोकांची हेरगिरी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

आजच्या या लेखात आपण पेगासस स्पायवेयर (Pegasus Spyware) काय आहे आणि हा वायरस फोनमध्ये नेमका कसा प्रवेश करतो, याबाबत जाणून घेऊया… (What is Pegasus Spyware and How it works?)

See also  RRR चित्रपटासाठी अजय देवगणने 7 दिवसांच्या शूटिंगचे घेतले तब्बल एवढे मानधन, आकडा ऐकूनच व्हाल थक्क

इस्त्रायली कंपनीने बनवले होते पेगासस…

इस्त्रायली कंपनी एनएसओने (NSO) पेगासस वायरस विकसित केले आहे आणि पेगासस स्पायवेअरविषयी प्रथम माहिती 2016 मध्ये मिळाली होती. स्पायवेअर त्याच्या नावासारखेच लोकांची फोनद्वारे लोकांची हेरगिरी करतो. पेगासस स्पायवेअर ज्या व्यक्तींची हेरगिरी करायची आहे त्याच्या मोबाइलवर एक लिंक पाठवतो. जर व्यक्तीने त्या लिंक वर क्लिक केले तर त्या व्यक्तीच्या मोबाइल मध्ये पेगासस स्पायवेअरचे मालवेअर इंस्टॉल होतात. काही वेळा तर या लिंकवर क्लिक करण्याचीसुद्धा गरज पडत नाही. पेगासस स्पायवेअर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर इंस्टॉल झाल्यावर पूर्ण फोन मधील माहिती हस्तगत करतो. याची त्या व्यक्तिला जाणीवही होत नाही. त्याच्या लक्षातही येत नाही की आपल्यावर नजर ठेवली जात आहे.

फोनमध्ये आपोआप इंस्टॉल होतो

See also  इतिहासातील या ३ सुंदर स्त्रियांमुळे झाली मोठमोठी यु'द्धे, या स्त्रीच्या सौंदर्याने तर संपूर्ण भारताला लावले होते वेड...

टोरंटोच्या सिटीझन लॅबने सप्टेंबर 2018 मध्ये या स्पायवेअरविषयी धक्कादायक माहिती दिली. पेगासस स्पायवेअर इतके धोकादायक आहे की ते बर्‍याचवेळा वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय फोनमध्ये इंस्टॉल होऊन हेरगिरी सुरू होते. सिटीझन लॅबने त्यावेळी सांगितले होते की पेगासस स्पायवेअर जगातील सुमारे 45 देशांमध्ये कार्यरत आहे.

फोनमध्ये इंस्टॉल झाल्यानंतर पेगासस स्पायवेअर वापरकर्त्याचे महत्वाचे पासवर्ड, खाजगी माहिती, कॉनटॅक्ट यादी, कॅलेंडर, SMS, कॉल इतिहास इत्यादि माहिती जतन करून संबंधित व्यक्तिला पाठवतो. तसेच ज्याची हेरगिरी सुरू आहे त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय फोनचा कॅमेरा आणि मायक्रोफोन सुरू करू शकतो. म्हणजे ज्या व्यक्तीने हे स्पायवेअर सोडले आहे ती व्यक्ती ज्याच्या मोबबाईलमध्ये हे पेगासस इंस्टॉल झाले आहे त्या व्यक्तीच्या आसपासच्या सर्व गोष्टी पाहू आणि ऐकू शकतो. एकदा पेगासस इंस्टॉल झाल्यावर फोन पासवर्ड सुरक्षित राहत नाही. फोन पासवर्ड पेगाससच्या हेरगिरीस रोखू शकत नाही.

See also  "अगंबाई तू उलटा ब्लाऊज घातला आहेस का गं?" चाहत्यांनी उडवली आलिया भट्टची खिल्ली...

तर यापासून वाचायचे कसे?

यासाठी तुम्ही वापरत असलेल्या मोबाइलचे सेक्युरिटी पॅच अद्ययावत करून घ्यावे व जेव्हाही नवीन अपडेट येईल तेव्हा ते अद्ययावत करत राहावे. तसेच कोणत्याही भ्रामक लिंकवर क्लिक करण्याचा मोह टाळावा.

Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment