काय आहे क्रांती रेडकरचा इतिहास? पहा नवाब मलिक काय म्हणाले तिच्या बद्दल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणजे “कोंबडी पळाली” या गाण्यातील ती अभिनेत्री. जिने या गाण्यातील आपल्या नृत्याने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले होते. हीच क्रांती रेडकर मागील काही दिवसांपासून पुन्हा सतत चर्चेत येऊ लागली आहे. एनसीबीचे समीर वानखेडे यांनी जसजशी सेलिब्रिटींवर का’रवाई करण्यास सुरुवात केली. तसतशी त्यांची ही सेलिब्रिटी पत्नी सुद्धा पुन्हा प्रसिद्धीत आली.

अभिनेत्री क्रांती रेडकर ही मूळची मुंबईची आहे. तिचे शालेय शिक्षण देखील मुंबईत पूर्ण झाले आहे. मुंबईतील नामांकित असलेल्या रुईया या महाविद्यालयातून तिने आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. 2000 साली “सून असावी अशी” या सिनेमातून तिने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. तर अभिनेता अजय देवगण याच्या “गंगाजल” या चित्रपटात सुद्धा क्रांतीने काम केले आहे. पुढे 2016 साली प्रदर्शित झालेल्या “जत्रा” या चित्रपटातून क्रांती रेडकर हिचे “कोंबडी पळाली” हे गाणे खूप प्रसिद्ध झाले.

See also  सनी लिओनच्या भावाची अजब करामात, पैशासांठी केले असे काही...

86755634

तर काही वर्षांपूर्वी क्रांती रेडकर हिचे नाव वा’दाच्या भोवऱ्यात अडकले होते. अभिनेत्री क्रांती ही स्पॉट फिक्सिंग प्रकरणात असल्याचे एका वृत्तवाहिनीने सांगितले होते. दुबईतील एका हॉटेलमध्ये क्रांती ही क्रिकेटपटू श्रीशांत सोबत सापडल्याचे या वृत्तवाहिनीने सांगितले होते. तर हा आ’रोप क्रांतीने फे’टाळून लावला होता. तिने या आ’रोपाविषयी सांगितले होते की, त्या दरम्यान मी माझ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तेव्हा कोकणातील कुङाळमध्ये होते. मग माझा स्पॉट फिक्सिंगशी संबंध कसा काय? हे संपूर्ण प्रकरण एकंदरीत को’र्टात गेल्यावर त्याचा निकाल सुद्धा तिच्या बाजूने लागला होता.

2017 मध्ये अभिनेत्री क्रांती रेडकर हिने समीर वानखेङेंसोबत अतिशय साध्या पद्धतीने विवाह करून मराठी सिनेसृष्टीला जबरदस्त ध’क्का दिला. त्यानंतर 2018 मध्ये क्रांतीने दोन जुळ्या मूलींना जन्म दिला. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रातून काढते पाऊल घेतले. मात्र त्याच दरम्यान तिने उद्योगास सुरुवात केली. स्वतःचे एक कपड्यांचे ब्रँड क्रांतीने आपल्या मूलींच्या नावाने सुरू केले. पुढे जसजसे समीर वानखेङे यांच्या नावाला वजन मिळू लागले, त्याप्रमाणे क्रांतीचा सुद्धा उद्योग वाढू लागला.

See also  मलायका आरोरा आणि अरबाज खान यांचा फक्त 'या' कारणांमुळे झाला होता घटस्फो'ट...

953701 sameer kranti 1

नुकतेच आर्यन खान प्र’करणामुळे समीर वानखेडे हे गोत्यात आले. यादरम्यान त्यांची पत्नी क्रांती रेडकर हिने अगदी सुरुवातीपासूनच आपल्या पतीची बाजू उचलून धरली. नवाब मलिक यांच्या आ’रोपांना स’डेतोड उत्तर देत न्याय मागण्यासाठी तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धाव घेतली.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व त्यांच्या शब्दांची आठवण करून दिली. नवाब मलिक यांनी केलेल्या आ’रो’पांचे प्रत्युत्तर देताना क्रांती खूप पेटून उठली. त्यावेळी नवाब मलिक हे तिला “तोंड सांभाळून बोल, मागील इतिहास काढला तर खूप महागात पडेल.” असे म्हणाले. परंतु आता क्रांती रेडकर हिचा हा मागील इतिहास काय आहे, हे तिलाच माहित असावे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment