मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीला काय परिधान करायला आवडतं? इंडियन आणि वेस्टर्न, जाणून घ्या सविस्तर…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

स्पृहा जोशीला काय परिधान करायला आवडते, जाणून घेऊया तिच्याच शब्दात…

Advertisement

आपण ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल असतो, त्या कपड्यांत आपण छान वावरतो. त्यामुळे मी नेहमीच कम्फर्टला प्राधान्य देते. मला शॉपिंग करायला आणि वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालायला अतिशय आवडतं. इंडियन आणि वेस्टर्न अशा दोन्ही प्रकारचे कपडे घालायला मला आवडतात.

मग त्यात जीन्स टॉप असोत, कुर्तीज असोत, वेगवेगळ्या प्रकारचे स्कर्ट्स, वन पिसेस असोत या सगळ्या प्रकारचे कपडे घालणं मी तितकंच एन्जॉय करते. शॉपिंग करताना ब्रँडचा मी फार विचार करत नाही. त्यामुळे ब्रेंडड गोष्टींचा मुद्दा आला की माझे स्टायलिस्ट जे कपडे मला देतात ते मी आवडीने आणि प्रेमाने घालते.

Advertisement

spruha joshi look

मला मनापासून साड्या नेसायला फार आवडतात. मग अगदी पैठणी, कांजिवरम पासून ते चंदेरी अशा सगळ्या प्रकारच्या साड्या नेसायला मला आवडतात; पण एक आहे की, वजनाने जड असतील अशा साड्या मला आवडत नाहीत. त्यामुळे कॉटन आणि लिनन मटेरिअलच्या साड्यांवर माझं विशेष प्रेम आहे. कारण त्या वजनाने हलक्या असतात. तसंच मला माझ्या आईने, आजीने किंवा सासूबाईंनी नेसलेल्या जुन्या साड्या नेसायला प्रचंड आवडतात. त्यात एक वेगळ्या प्रकारची ऊब असते.

See also  धर्मेंद्रने मिथुन चक्रवर्तीकडून मागून "ही" फिल्म सनी देओलला दिली, पुढे घडला तो इतिहास...

“उंच माझा झोका” या मालिकेत रमाबाई रानडे यांची भूमिका साकारताना मला नऊवारी साडी नेसायची होती आणि “रंगबाज फिर से” या वेब सिरीजमध्ये माझी राजस्थानी पद्धतीची वेशभूषा होती. या दोन्हीही प्रकारच्या वेशभूषांमध्ये मी छान कम्फर्टेबल होते. वेशभूषा ही तुम्हाला त्या व्यक्तिरेखेत शिरायला फार मदत करते असा माझा स्वतःचा अनुभव आहे.

Advertisement

117872853 3220194901404672 3215621628265533670 o

आणि या दोन्ही भूमिका साकारताना काही काळानंतर मला नऊवारी आणि राजस्थानी अशा दोन्ही प्रकारच्या साड्या नेसता येऊ लागल्या. मोगरा हे आमचं नेटक आम्ही आपापल्या घरून सादर करतो. तसं जरी असलं तरी त्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेची मानसिकता, आपल्या आधी आणि आपल्या नंतर कोणी काय रंगाचे कपडे घातले आहेत, प्रत्येकाच्या घरातलं फर्निचर कसं आहे या सगळ्याचा विचार करून आमची वेशभूषा ठरवली आहे आणि प्रत्येक प्रयोगात आम्ही ती एकच वेशभूषा फॉलो करतो.

See also  या बॉलिवूड अभिनेत्रींची स्वतःच्या लग्नात रडून रडून झाली होती अशी अवस्था, ३ नंबरची अभिनेत्री तर...

मला माझा छान मेकअप करता येतो. कार्यक्रम किंवा कुठे इंटरव्ह्युजना जाताना मी स्वतः माझा मेकअप करते. फक्त स्क्रिनवर दिसण्यासाठी जो मेकअप केला जातो त्याला एक वेगळं कौशल्य लागतं. तो एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.

Advertisement

त्यामुळे मला आपल्या मेकअप आर्टिस्ट्सबद्दल खुप आदर आहे. ज्वेलरीच्या बाबतीत मी खुप पर्टिक्युलर आहे. मला वजनाने हलकी आणि नाजूक काम असलेली ज्वेलरी खुप आवडते. सोन्याचे दागिने घालण्याकडे माझा फारसा कल नाहीये. त्याऐवजी मला चांदीची ज्वेलरी घालायला खुप आवडते.

spruha joshi in saree look

मी खुप कम्फर्टेबल फूटवेअरची चाहती आहे. माझी उंची कमी असल्यामुळे बऱ्याच वेळा मला हिल्स घालाव्या लागतात पण फ्लॅट शूज, पटकन पायात चढवता येणाऱ्या स्लिपॉन्स अशा प्रकारचे फूटवेअर घालायला मला खुप आवडतात आणि रेग्युलर वापरातल्या माझ्या चपला या कायम फ्लॅटफूट असतात.

Advertisement

शेवटी मी इतकंच सांगेन की, ज्या कपड्यांमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल असे कपडे तुम्ही घाला. कारण कम्फर्टेबल क्लोदिंग फार छान दिसतं आणि तुम्ही कॉन्शस होत नाही. त्यामुळे आपोआप एक सहजता येते तुमच्या वागण्या-बोलण्यामध्ये तुम्ही घातलेल्या कपड्यांमुळे. छान दिसणं हे आलंच पण त्या पलीकडे जाऊन आपला कम्फर्ट खुप महत्वाचा आहे.😊
(सकाळ पेपरमधील एक मुलाखत, शब्दांकन – राजसी वैद्य)

आपण ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल असतो, त्या कपड्यांत आपण छान वावरतो. त्यामुळे मी नेहमीच कम्फर्टला प्राधान्य देते. मला…

Posted by Spruha Joshi on Sunday, 16 August 2020

लेख सौजन्य – स्पृहा जोशी फेसबुक पेज

See also  हे प्रसिद्ध युट्यूब स्टार लवकरच झळकणार बॉलीवूड चित्रपटांमध्ये, हि मराठी युट्यूब स्टार तर...
Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close