जेव्हा अभिनेत्री सनी लियोनी बोलते चक्क मराठी, ऐकूनच लावाल तुम्हीपण डोक्याला हात…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुडच्या मायानगरीत बहुतेक मोठमोठे स्टार्स आहेत. जे अमराठी आहेत, तरीही आपण महाराष्ट्र राज्यात राहतो. त्यामुळे ते मराठी भाषेचा आदर करतात, सन्मान करतात. इतकंच नव्हे तर मराठी खूप चांगलं बोलतात. अक्षयकुमार, अजय देवगण, सलमान खान हे सुपरस्टार तर खूप उत्कृष्ट मराठी बोलतात. मात्र आता यामध्ये आणखी एका अभिनेत्रीचे नाव सामील झाले आहे. ते नाव कोणते बरं…तर मित्रांनो ते नाव म्हणजे बोल्ड व ग्लॅमरस अभिनेत्री सनी लियोनी. सनी लियोनीला खूप स्पीड मध्ये मराठी बोलता येत नसेल तरी ती आपल्या मराठी भाषेतील काही शब्द अगदी स्पष्टपणे बोलते.

नुकताच “लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड २०२१” हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या पुरस्कार सोहळ्यात सनी लियोनी ही चक्क मराठी बोलताना दिसली होती.”लोकमत मोस्ट स्टायलिश अवार्ड २०२१” हा पुरस्कार सोहळा काही दिवसांपूर्वीच मुंबई मध्ये पार पडला होता. त्या पुरस्कार सोहळ्यात सनी लियोनी सुद्धा उपस्थित होती. या पुरस्कार सोहळ्यात सनी लियोनीला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

See also  बॉलिवूडवर पसरली शो'ककळा या प्रसिद्ध अभिनेत्याचं अ'चानक झालं नि'धन...

दरम्यान या पुरस्कार सोहळ्यात होस्टने सनी ला विचारले की, आपण मुंबई मध्ये राहतो आणि लोकल भाषा ही मराठी आहे. तर आपण वेगळे काही तरी करूया.त्यासाठी आपण beyounick ला स्टेज वर बोलवू आणि मराठी काहीतरी ट्राय करूया, असे होस्ट म्हणाले. त्यावर सनी ने ताबडतोब “नको – नको” हे शुद्ध मराठीत म्हटले. त्या नंतर beyounick हा स्टेज वर आला. तरीदेखील सनी लियोनी ही होस्टला उलट “गप्प बस” असे म्हणताना दिसली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सनी लियोनी हे दोन- तीन शब्द स्वतःहूनच बोलली. तिला कुणीही यासाठी मदत केली नव्हती.

बॉलीवुडच्या या सुंदरेला जरी मराठी पूर्णपणे बोलता येत नसले, तरीही ती आतपर्यंत दोन मराठी सिनेमांत दिसली आहे. सुपरहिट मराठी चित्रपट “बॉईज” यातील “कुठं कुठं जायाचं हनिमूनला” “आमदार निवास” या सिनेमातील “शांताबाई” या गाण्यावर तिने आयटम साँग केले आहेत. तिच्या ह्या गाण्यांना भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे इंग्लिश फाडफाड बोलणाऱ्या सनी लियोनी चा मराठी भाषेशी काहीच संबंध नाही, असे म्हणता येणार नाही.

See also  बॉलिवूड अभिनेत्री प्राची देसाईचा गं'भी'र आरोप म्हणाली, 'माझ्या सोबत डायरेक्टरने...'

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment